शिळी पोळी आणि ‘या’ वस्तू दान करीत असाल तर लगेच व्हा सावध!; येऊ शकते कंगाल होण्याची वेळ!

हिंदू धर्मात देवी-देवतांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी भक्त पूजा-अर्चा करतात. तर काही जण उपवास आणि व्रत करतात . याशिवाय देवाचा कृपा आशीर्वाद मिळविण्याचा आणखी एक मार्ग आहे, जो अनेकजण अवलंबतात तो म्हणजे दान करणे. सनातन धर्मात दानाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. सनातन धर्मानुसार चार युग आहेत.  या चार युगांमध्ये विशिष्ट पुण्य कर्माचे वैशिष्ट्य सांगण्यात आले आहे. सत्ययुगात […]

शिळी पोळी आणि 'या' वस्तू दान करीत असाल तर लगेच व्हा सावध!; येऊ शकते कंगाल होण्याची वेळ!
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 3:14 PM

हिंदू धर्मात देवी-देवतांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी भक्त पूजा-अर्चा करतात. तर काही जण उपवास आणि व्रत करतात . याशिवाय देवाचा कृपा आशीर्वाद मिळविण्याचा आणखी एक मार्ग आहे, जो अनेकजण अवलंबतात तो म्हणजे दान करणे. सनातन धर्मात दानाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. सनातन धर्मानुसार चार युग आहेत.  या चार युगांमध्ये विशिष्ट पुण्य कर्माचे वैशिष्ट्य सांगण्यात आले आहे. सत्ययुगात तप, त्रेतामध्ये ज्ञान, द्वापरातील यज्ञ आणि कलियुगात दान यामुळे माणसाचे कल्याण होते. दानधर्माची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. लोकसुद्धा आपल्या पूर्वजांना खुश करण्यासाठी दान करतात. वास्तू आणि ज्योतिषशास्त्रात दान करणे खूप शुभ मानले जात असले तरी यासाठी काही नियमही आहेत. या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास घरात कलह आणि गरिबी येऊ शकते ( trouble for you). लोक काही गोष्टी विचार न करता दान करतात, ज्यामुळे त्यांचे नुकसान होते (donation of wrong things). आज अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत  ज्याचे दान करणे टाळावे.

या गोष्टीचे दान कधीच करू नये

  1. शिळी पोळी-  शास्त्रात अन्न आणि पाणी हे महादानाच्या श्रेणीत आहेत, पण त्यासाठी योग्य पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. बरेच जण उरलेली भाकरी घरी आलेल्या बिक्षेकरीला दान करतात. कोणाचे तरी पोट भरून त्यांनी चांगले काम केले आणि त्यातून पुण्य केले असे त्यांना वाटते, पण ज्योतिषशास्त्रानुसार हे अशुभ कृत्य आहे. गरीब किंवा गरजूंना नेहमी ताजे अन्न दान करा. बऱ्याचदा लोकं अन्नाचे दान करण्याच्या नावाखाली शिळ्या अन्नाची विल्हेवाट लावतात.
  2. स्टीलची भांडी- लोक आपल्या पूर्वजांना किंवा पितरांना प्रसन्न करण्यासाठी अशा गोष्टी दान करू लागतात, जे ज्योतिषशास्त्रानुसार योग्य नाही. ज्यामध्ये स्टीलच्या भांड्यांचाही समावेश आहे. स्टीलच्या भांड्यांचे दान कुटुंबात कलह निर्माण करते.
  3. अपात्र दान- एखाद्या भिक्षुकाला पैसे दान करताना त्याच्या पात्रात दान करावे. पैसे किंवा कुठलेच दान हे अपात्र करू नये. यामुळे कुठलेही पुण्य लाभत नाही उलट दोष निर्माण होतो.
  4. मद्य किंवा मांस- मद्य आणि मांस याचे दान हिंदू धर्मात निषिद्ध आहे. हल्ली पार्टीच्या नावाखाली सर्रास मद्य आणि मांसाहाराची मेजवानी देण्यात येते. ही मेजवानी देणे म्हणजे एक प्रकारे दान देणेच होय. यामुळे धन हानी, कुटुंबात कलह, संततीमध्ये दोष आणि पितृदोष निर्माण होतात.
  5. हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.