Get Child : ‘हे’ उपाय केल्यास मिळू शकतं संतती प्राप्तीचं सुख !
कपल्स मूल जन्माला घालण्याआधी त्याचं प्लॅनिंग करतात. खराब लाईफस्टाईल, योग्य वयात लग्न न करणं अशा बऱ्याच कारणाने आरोग्यावर परिणाम होतो. अशावेळी संतती सुख मिळायला अडचणी निर्माण होतात. डॉक्टरांच्या सल्ल्यासोबतच हे उपाय तुम्हाला मदतीचे ठरू शकतात.
मुंबई : पूर्वी लग्न झालं कि जोडप्यांवर ( Couples) संततीसाठी दबाव टाकला जायचा पण आजकाल महिला देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सगळ्या जबाबदाऱ्या पार पडताना दिसतात. पूर्वीच्या तुलनेत आत्ताच्या महिला जास्त प्रमाणात नोकरी करताना दिसतात. त्यामुळे आता कुटुंबनियोजन (Family Planning) ही पद्धत दिसून येते. कपल्स मूल जन्माला घालण्याआधी त्याचं प्लॅनिंग करतात. खराब लाईफस्टाईल, योग्य वयात लग्न न करणं अशा बऱ्याच कारणाने आरोग्यावर (Health) परिणाम होतो. अशावेळी संतती सुख मिळायला अडचणी निर्माण होतात. आरोग्याशिवाय त्यांच्या ग्रहांची स्थिती सुद्धा खराब असू शकते. जर तुम्ही अशा कुठल्याही समस्येतून जात असाल आणि तुम्हाला संततीप्राप्तीचं सुख अनुभवायचं असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यासोबतच काही ज्योतिषी उपाय देखील करून बघू शकता. कदाचित हे उपाय तुम्हाला मदतीचे ठरू शकतात. जाणून घ्या संतती सुख देणारे काही ज्योतिषी उपाय…
लाल गायीची सेवा करणे
संतती सुख जर अनुभवायचं असेल तर कपल्सने लाल रंगाची गाय आणि लाल बछड्याची सेवा केली पाहिजे. असं केल्यास संततीप्राप्तीसाठी ज्या ग्रहांच्या स्थितीमुळे अडचणी निर्माण होत आहेत ते नियंत्रणात येऊ शकतं. याशिवाय तपकिरी रंगाच्या कुत्र्याला रोज जेवण द्यायचं. अशाप्रकारची सेवा तुम्ही तपकिरी रंगाचा कुत्रा पाळूनदेखील करू शकता.
गोमती चक्र
जर तुमचा गर्भ राहत नसेल किंवा तुम्हाला सारखाच गर्भपाताचा सामना करावा लागत असेल तर शुक्रवारी लाल कपड्यात गोमती चक्र गुंडाळून ते महिलेच्या कमरेला बांधावं. याने गर्भधारणेची प्रक्रिया आधीपेक्षा चांगली होईल आणि गर्भधारणा झाली असेल तर असे केल्यास गर्भपात होण्याची शक्यता टळेल.
पितृदोष उपाय
बरेचदा पितृदोष असल्यामुळे देखील परिवारात वंशवृद्धीला अडचणी निर्माण होऊ शकतात. जर तुमच्या घरात पितृदोष सारखी समस्या असेल तर त्याचं निवारण लवकरात लवकर करून घ्या. याने तुमच्या सगळ्या कौटुंबिक समस्यांचा अंत होऊ शकतो. अमावास्येच्या दिवशी पिंपळाचं एक झाड लावावे आणि त्याची नियमित सेवा करावी.
आक वनस्पतीचं मूळ
आक वनस्पतीचं मूळ या बाबतीत उपयोगी ठरू शकतं. महिलांनी आपल्या मासिक पाळीत सातव्या दिवशी पांढऱ्या रंगाच्या आकड्याच्या वनस्पतीचं मूळ घेऊन शिवलिंगावर सात वेळा उतरवून लाल कपड्यात बांधावे आणि ते कापड कमरेला बांधावे. हा उपाय केल्यास लवकर गर्भधारणा होऊ शकते.
चांदीची बासरी
जर तुमच्या घरात बाळ गोपाळ असतील तर चांदीची बासरी अर्पण करून नियमितपणे त्यांची पूजा करण्यात यावी. बाळ गोपाळच्या समक्ष संतती सुखाची इच्छा व्यक्त करावी. या उपायाने सुद्धा तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते.
( ही माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती इथे सादर करण्यात आली आहे. तज्ञांचा सल्ला घेऊनच हे उपाय करण्यात यावेत. )
इतर बातम्या :