महाशिवरात्रीला होणार महाकुंभांच शेवटचे अमृत स्नान, पाहा शुभ मुहूर्त
13 जानेवारीला महाकुंभ सुरू झाला. या महासोहळ्यात सहभागी होण्यासाठी देशभरातून नागा साधू-संतांसह भाविक मोठ्या संख्येने आले होते. यावेळी सर्वांनी संगमात श्रद्धेने स्नान करून पुण्य प्राप्त केले. महाकुंभमेळा लवकरच संपणार असून शेवटचे महास्नान महाशिवरात्रीच्या दिवशी होणार आहे. तर त्या दिवशी स्नान करण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता आहे. जाणुन घेऊयात.

Prayagraj Mahakumbh 2025 : श्रद्धेचा महान उत्सव असलेले महाकुंभ 13 जानेवारीला सुरू झाला, त्यानंतर 14 जानेवारी रोजी म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी पहिले अमृत स्नान करण्यात आले. यावेळी देशभरातील संत आणि भक्तांनी संगमात धार्मिक स्नान केले. यानंतर मौनी अमावस्येला दुसरे अमृत स्नान करण्यात आले आणि वसंत पंचमीच्या दिवशी तिसरे स्नान करण्यात आले.
तिसऱ्या अमृत स्नानानंतर महाकुंभमेळ्याला आलेले सर्व संत आणि ऋषी आपापल्या आखाड्यात परतले, त्यानंतरही महाकुंभमेळा अजूनही सुरू आहे, जो महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर संपणार आहे. महाकुंभा येथील शेवटचे स्नान देखील त्याच दिवशी होणार आहे. तर या दिवशी स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त कोणता असणार आहे त्याबद्दल जाणून घेऊयात.
महाकुंभाची समाप्ती तारीख




माघ पौर्णिमेनंतर महाकुंभाचे शेवटचे स्नान महाशिवरात्रीच्या दिवशी केले जाईल. २६ फेब्रुवारी बुधवार रोजी महाशिवरात्र सकाळी 11वाजून 08 मिनिटांनी सुरू होईल. ते २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजून ५४ मिनिटांनी संपणार आहे. महाशिवरात्रीची पूजा रात्री केली जाते, म्हणून महाशिवरात्रीचे व्रत देखील २६ फेब्रुवारी रोजी पाळले जाईल आणि महाकुंभमेळ्याचा समारोप देखील याच दिवशी होईल.
महाकुंभात स्नान करण्यासाठी शुभ मुहूर्त
हिंदू कॅलेंडरनुसार शेवटच्या महास्नानाचा शुभ काळ सकाळी ५:०९ ते ५:५९ पर्यंत असेल. याशिवाय स्नानासाठी इतर शुभ काळ खालीलप्रमाणे आहेत-
सकाळ आणि संध्याकाळ: ०५:३४ ते ०६:४९ पर्यंत असणार आहे.
अमृत काळ: सकाळी ०७:२८ ते ०९:०० वाजेपर्यंत असेल.
विजय मुहूर्त: दुपारी ०२:२९ ते ०३:१५ पर्यंत असेल.
संधिप्रकाश वेळ: ०६:१७ ते ०६:४२ पर्यंत असेल.
महाकुंभातील त्रिवेणी संगमात स्नान करण्याचे महत्त्व
महाकुंभात त्रिवेणी संगमात स्नान केल्याने व्यक्तीचे मन आणि आत्मा शुद्ध होतो. जीवनात जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे केलेल्या पापांपासून मुक्तता मिळते आणि मोक्ष मिळतो. महाकुंभात स्नान केल्याने असंख्य यज्ञ आणि तपस्येइतके पुण्य मिळते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)