पुढील 10 दिवस अत्यंत अशुभ, पण घरामध्ये ‘या’ गोष्टी आणा आणि आपले नशीब बदला!
मकर संक्रांत हा जानेवारी महिन्यात आणि हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येणारा एक महत्त्वपूर्ण सण आहे. मात्र, पौष महिना हा अशुभ महिना मानला जातो. या काळात सूर्याचे तेज कमी असते. त्यामुळे या महिन्यात कोणतेही शुभ कार्य केली जात नाहीत.
मुंबई : मकर संक्रांत हा जानेवारी महिन्यात आणि हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येणारा एक महत्त्वपूर्ण सण आहे. मात्र, पौष महिना (Paush months) हा अशुभ महिना मानला जातो. या काळात सूर्याचे तेज कमी असते. त्यामुळे या महिन्यात कोणतेही शुभ कार्य केली जात नाहीत. इतकेच नाहीतर या महिन्यामध्ये लग्न, समारंभ, नवीन गाडी, नवीन दुकान, गृहप्रवेश किंवा कोणत्याही नवीन वस्तूची खरेदी करणे या महिन्यामध्ये टाळले जाते.
20 डिसेंबरपासून पौष महिना सुरू झाला असून तो 17 जानेवारीपर्यंत चालणार आहे. यामुळे या महिन्यात आपण विशेष लक्ष दिले पाहिजे. या महिन्यामध्ये पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते. सूर्यदेवाची पूजा केली जाते. या दिवसापासून सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो. असे मानले जाते की शुक्ल पक्षामध्ये काही खास गोष्टी घरात आणल्या तर आपण नशीबच बदलून जाते. चला तर मग जाणून घेऊयात, या वस्तू नेमक्या कोणत्या. zee news ने यासंदर्भात रिपोर्ट दिला आहे.
-पुढे 10 दिवसांमध्ये लाल आणि पिवळ्या रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते. यामुळे या काळात शक्यतो लाल आणि पिवळे कपडे घालण्याचा प्रयत्न करा. ते आपल्यासाठी खूप शुभ आहे.
-या 10 दिवसांमध्ये आपण आपल्या घरामध्ये गणपती आणि लक्ष्मीची चांदीची मूर्ती आणावी. या मूर्तीची दररोज पूजा करा. यामुळे आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये धनप्राप्ती होईल.
-मोती शंख घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते. पौष महिन्यातील शुक्ल पक्ष हा दक्षिणावर्ती शंख घरात आणण्यासाठी उत्तम मुहूर्त आहे. त्याची विधिवत स्थापना करून रोज पूजा करावी.
-पुढील 10 दिवसांत केव्हाही घरी तांब्याचे भांडे आणा आणि त्याने सुर्यदेवाला दररोज पाणी अर्पण करा. सूर्य हा यशाचा कारक असून त्याच्या कृपेनेच यश, आत्मविश्वास आणि चांगले आरोग्य मिळते.
संबंधित बातम्या :