कोणतीच कामं वेळेत होत नाहीत? शनिवारी 5 कामे करुन बघा चुटकीसरशी होतील सर्व कामं

शनिवार हा शनिदेवाला समर्पित मानला जातो. शनिदेव हे न्यायाचे देवता मानले जातात, जे माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. जेव्हा शनि देव एखाद्यावर कृपा करतो तेव्हा त्याचे संपूर्ण आयुष्य बदलते.

कोणतीच कामं वेळेत होत नाहीत? शनिवारी 5 कामे करुन बघा चुटकीसरशी होतील सर्व कामं
shani dev
Follow us
| Updated on: Nov 13, 2021 | 8:35 AM

मुंबई : शनिवार हा शनिदेवाला समर्पित मानला जातो. शनिदेव हे न्यायाचे देवता मानले जातात, जे माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. जेव्हा शनि देव एखाद्यावर कृपा करतो तेव्हा त्याचे संपूर्ण आयुष्य बदलते. ती व्यक्ती शारीरिक, मानसिक आणि आर्थिक तिन्ही मार्गांनी समृद्ध राहते. पण याउलट जेव्हा शनीदेव कोणावर रागावतो तेव्हा त्याचे जगणेही कठीण होते. जर तुमच्या कुंडलीत शनी देखील अशुभ स्थानावर बसला असेल आणि तुम्हाला सतत त्रास देत असेल किंवा तुम्ही साडेसाती आणि शनीच्या दह्याचा त्रास सहन करत असाल तर शनिवार हा दिवस तुमच्यासाठी खूप खास आहे. शनिवारी काही उपाय केल्याने तुम्ही शनिदेवाला सहज प्रसन्न करू शकता, तसेच त्यांच्यामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत हे उपाय

हे 5 उपाय शनीची नाराजी दूर करतील

1. शनिवारी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडावर दिवा लावल्याने शनिदेव प्रसन्न होतात. मंदिरात पिंपळाचे झाड लावले तर ते अधिक शुभ मानले जाते. असे केल्याने तुमचे अनेक त्रास दूर होतात. आर्थिकदृष्ट्या विशेष फायदा होईल.

2. शनिदेव हनुमान यांचे जवळचे नाते पुराणामध्ये दिले आहे. त्यामुळे भगवान हनुमान यांची पुजा केल्याने शनी देव लवकर प्रसन्न होतात. एका पौराणिक मान्यतेनुसार, शनिदेवाने हनुमानजींना वचन दिले होते की ते हनुमानजींच्या भक्तांना कधीही त्रास देणार नाहीत. त्यामुळे शनिवारी हनुमानाची पुजा केल्याल आयुष्यातील दु:ख कमी होण्यास मदत होते.

3. जर तुमच्या जवळ शनि मंदिर असेल तर शनिवारी शनिदेवाच्या मूर्तीला निळ्या रंगाची फुले आणि मोहरीचे तेल अर्पण करु शकता यामुळे शनी देवाची कृपा होते अशी मान्यता आहे.

४. पिंपळाचे झाड हे भगवान विष्णूचे निवासस्थान मानले जाते. गीतेत श्रीकृष्णाने स्वतः सांगितले आहे की माझे वास्तव्य पिंपळ्याच्या झाडांमध्ये आहे. त्यामुळे पिंपळाचे झाड पूजा करणाऱ्या व्यक्तीवर ते खूप प्रसन्न होतात.

5. शनिवारी एखाद्या गरजू व्यक्तीला तेल दान करा. यामुळे शनीचा प्रभाव कमी होतो. याशिवाय शनिवारी एखाद्या गरजूला अन्नदान करा, कपडे, काळी मसूर, काळे तीळ, काळे हरभरे इत्यादी देऊन मदत करा. हे सर्व केल्याने तुमच्या हातातून पुण्याचे कामही होईल.

(टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.)

इतर बातम्या :

Numerology Today 11, November | सूर्यासारखा तापट स्वभाव पण मनानेही तितकेच संवेदनशील, तुमचा शुभ अंक 1 आहे?, मग हे खास तुमच्यासाठी

Zodiac Sign | भरपूर पैसा कमावतात या 4 राशींचे लोक, तुमची रास यामध्ये आहे का?

Zodiac signs | लॉयल पार्टनरच्या शोधात आहात, मग या राशींच्या लोकांचा नक्की विचार करा

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.