या उपायांनी बदलेल तुमचे नशीब, घरात नांदेल लक्ष्मी आणि अन्नपूर्णा
ज्योतिष शास्त्रामध्ये दररोज दिवा लावण्याचे विशेष महत्त्व सांगितले आहे. पूजेच्या वेळी दिवा लावल्याने देवी आणि देवता प्रसन्न होतात. पूजे व्यतिरिक्त घरात दिवा लावल्याने अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते. जाणून घेऊया धनप्राप्तीसाठी दिवा लावण्याचे काही उपाय.
देवी देवतांची पूजा करताना दिवे लावण्याची धार्मिक परंपरा आहे. ज्योतिष शास्त्रात दररोज दिवा लावणे गरजेचे मानले गेले आहे. पूजे मध्ये दिवे लावण्यासोबतच ज्योतिष शास्त्रात दिवे लावण्याचे काही उपाय सांगितले आहे. जे धनप्राप्तीसाठी अत्यंत फायदेशीर आहेत. दिव्यांच्या या उपायांचा अवलंब केल्यास तुमचे नशीबही बदलू शकते. दिव्यांशी संबंधित या उपायांचे पालन केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि जीवनात सुख शांती मिळते.
धनप्राप्तीसाठी दिव्यांशी संबंधित उपाय जाणून घेऊ.
शनीचा प्रकोपापासून मिळेल मुक्ती
राहू केतू दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सकाळ संध्याकाळ जवसाच्या तेलाचा दिवा लावा. जवसाच्या तेलाचा दिवा लावल्याने कुंडलीतील राहू, केतू दोष दूर होण्यास मदत होते. त्यासोबतच दर शनिवारी शनी मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने साडेसातीचा प्रभाव कमी होईल.
मान सन्मान मिळेल
समाजात तुमचा मान वाढवण्यासाठी तुम्ही रोज तुपाचा दिवा लावा. तुमचा समाजात आदर व्हावा यासाठी रोज सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य द्या आणि तुपाच्या दिव्याने आरती करा. या उपायामुळे समाजात तुमचा मानसन्मान वाढेल आणि तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील.
सुख समृद्धी
दररोज बाळकृष्णासमोर आणि गुरुवारी विष्णू समोर शुद्ध तुपाचा दिवा लावल्याने सुख-समृद्धी मिळते. तसेच ‘ओम नमो भगवते वासुदेवाय नमः’ . या मंत्राचा गुरुवारी 108 वेळा जप करावा. हा उपाय केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि सुख शांती राहते.
उत्पन्नातील अडथळे दूर होतील
धनाची देवी लक्ष्मी आहे. लक्ष्मी देवी समोर सात मुखी म्हणजेच सात दिवे लावा. दिवे लक्ष्मीला शुद्ध तुपाचे सातमुखी दिवा लावल्याने धनाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. हा उपाय केल्यास तुमच्या आर्थिक सर्व समस्या दूर होतील आणि अडकलेली पैसेही परत मिळतील. त्याचबरोबर सरस्वती देवी समोर दोन दिवे लावल्याने बुद्धी तीक्ष्ण होते.
धन धान्याची कमी होणार नाही
बुधवारी गणपती समोर त्रिमुखी शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि त्यांना दूर्वा अर्पण करा. या उपायाने घरात कधीही धन धरण्याची कमतरता भासणार नाही. याशिवाय हा उपाय उत्पन्न वाढीसाठी आणि संपत्ती मिळवण्यासाठी देखील खूप प्रभावी सिद्ध होतो.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)