Spiritual Trees | हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानली जातात ही झाडं, जाणून घ्या कोणत्या झाडाचं काय महत्त्व?

हिंदू संस्कृतीत अनेक प्रकारच्या पौराणिक गोष्टींना महत्त्व दिले गेले आहे. तसेच, अनेक झाडे देखील अतिशय शुभ मानली जातात. अशा अनेक वृक्षांना मान्यता देण्यात आली आहे, जी जीवनातील संकटे दूर करतात. विशेष म्हणजे अशा झाडांची लोक पूजा करतात. पण, या झाडांचा उपयोग घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठीही केला जातो.

Spiritual Trees | हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानली जातात ही झाडं, जाणून घ्या कोणत्या झाडाचं काय महत्त्व?
Spiritual Trees
Follow us
| Updated on: Nov 12, 2021 | 12:06 PM

मुंबई : हिंदू संस्कृतीत अनेक प्रकारच्या पौराणिक गोष्टींना महत्त्व दिले गेले आहे. तसेच, अनेक झाडे देखील अतिशय शुभ मानली जातात. अशा अनेक वृक्षांना मान्यता देण्यात आली आहे, जी जीवनातील संकटे दूर करतात. विशेष म्हणजे अशा झाडांची लोक पूजा करतात. पण, या झाडांचा उपयोग घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठीही केला जातो.

वेद आणि पुराणात अनेक ठिकाणी सांगितले गेले आहे की तुळशी असो वा पिंपळ, सर्वांचे स्वतःचे आध्यात्मिक महत्त्व आहे. आजच्या आधुनिक युगातही लोक या झाडांची पूजा करतात. चला जाणून घेऊया हिंदू धर्मातील काही पुजनीय वृक्षांबाबत –

पिंपळाचे झाड

हिंदू परंपरेनुसार, पिंपळाचे झाड पवित्र आणि पूजनीय मानले जाते. हे झाड हनुमान आणि शनिदेवाच्या मंदिराभोवती दिसते. असे म्हटले जाते की जीवनात कोणतीही अडचण आली तर रोज पिंपळाच्या झाडाची सेवा करावी. त्याने सर्व त्रास दूर होतात. शनिदोष दूर करण्यासाठीही पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते. शनिदेव अशुभ परिणाम देत असेल तर संध्याकाळी झाडाखाली तेलाचा दिवा लावावा असे सांगितले जाते.

तुळशीचे रोप

तुळशीचे रोप जवळपास प्रत्येक घरात पवित्र मानले जाते. लोक कोणत्याही शुभ कार्यात तुळशीपूजनाला स्थान देतात. असे म्हणतात की हे रोप घरात लावल्याने नकारात्मकताही दूर होते. ही वनस्पती औषध म्हणूनही वापरली जाते. तुळशीची पूजा घरामध्ये संपत्ती इत्यादीसाठीही केली जाते.

केळीचे झाड

हिंदू संस्कृतीत हा एक अतिशय शुभ वृक्ष मानला जातो. या झाडाला भगवान विष्णूचे प्रतिक मानले जाते. त्यामुळेच गुरुवारी या झाडाची विशेष पूजा केली जाते. असे म्हणतात की गुरुवारी या झाडाची पूजा केल्यास बिघडलेले काम आणि रखडलेले काम यशस्वी होते.

कमळाचे फूल

देवी लक्ष्मी कमळाच्या फुलावर विराजमान आहे. हे फूल अनेक देवी-देवतांचे आवडते फूल मानले जाते. हे पवित्रता, सौंदर्य, तपश्चर्या आणि दिव्यतेचे प्रतीक आहे. हे फूल चिखलात उमलते. असे मानले जाते की कमळाचे फूल अर्पण केल्याने भक्तांना सौभाग्य आणि आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होते.

बेलाचे झाड

बेल वृक्ष देखील खूप शुभ मानले जाते. या झाडाची पाने भगवान शंकराची पूजा करण्यासाठी वापरली जातात. दररोज भगवान शंकरावर बेलाची पाने अर्पण केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात. असे मानले जाते की या झाडाची तीन पाने भगवान शंकराच्या तीन डोळ्यांचे प्रतीक आहेत.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Vastu Debt Remedies | खूप प्रयत्न करूनही कर्ज कमी होत नाहीयं? मग 3 वास्तूदोष लगेच दूर करा

Kartik Purnima 2021 | कार्तिक पौर्णिमा कधी आहे? काय आहे तीचे महत्त्व, जाणून घ्या इत्तंभूत माहिती

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....