भगवान साकेत रामचंद्राची पूजा, अभिषेक; हैद्राबादमध्ये ‘समता कुंभ 2023’ सोहळ्यासाठी भाविकांची तुफान गर्दी

समता कुंभमध्ये तिसऱ्या दिवशी संध्याकाळी भगवान साकेत रामचंद्राची शेषवाहन सेवा केली जाते. भगवान श्रीमन्नारायण ज्या रुपात वैकुंठात वीससनममध्ये विराजमान आहेत, त्याच्याशी हे मिळते जुळते आहे.

भगवान साकेत रामचंद्राची पूजा, अभिषेक; हैद्राबादमध्ये 'समता कुंभ 2023' सोहळ्यासाठी भाविकांची तुफान गर्दी
samatha kumbha Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 05, 2023 | 8:40 AM

हैद्राबाद : हैद्राबादमध्ये समता कुंभ 2023चं आयोजन करण्यात आलं आहे. गेल्या तीन दिवसांपासून हा सोहळा सुरू आहे. 12 फेब्रुवारीपर्यंत हा सोहळा चालणार आहे. या सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशीही हजारो भाविकांनी हैद्राबादेत प्रचंड गर्दी केली. शनिवारी सोहळ्यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भगवान साकेत रामचंद्राची पूजा करण्यात आली. यावेळी मुचिंतल आश्रमात देवाच्या 18 मूर्तींची तिरुंमजना सेवा करण्यात आली. तसेच 18 दिव्य मूर्तींचा अभिषेकही करण्यात आला. ज्या लोकांनी एक दिवसआधी गरुड सेवेत भाग घेतला त्यांच्या हस्ते हा अभिषेक सोहळा पार पडला.

हैद्राबादच्या मुचिंतल आश्रमात समता कुंभ सोहळा 2023चं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून भाविक आणि साधू संत हैद्राबादेत दाखल झाले आहेत. तिरुमंजना सेवा ही वैश्विक स्तरावर केली जाते. जे लोक ही सेवा पाहता त्यांच्यासाठी ही सेवा नवी आहे.

हे सुद्धा वाचा

मात्र, जे लोक गेल्या अनेक वर्षापासून ही सेवा करतात तेही पहिल्यांदाच ही सेवा करत असल्यासारखं मोठ्या उत्साहात या सेवेत भाग घेतात. एकाच ठिकाणी एवढ्या विविध रुपात श्री रामचंद्राचं असणं हे पहिल्यांदाच घडत आहे. एकाचवेळी 18 रुपात श्री रामचंद्राची तिरुमंजना सेवा करणं हा दुर्लभ योग असल्याचं चिन्ना जियर स्वामी यांनी सांगितलं.

नवी ऊर्जा प्रवाहित होते

या परिसरात सर्व काही नवं असेल. तिरुमंजना सेवेच्या अंतर्गत पेरुमल (ईश्वर)ला सर्वात आधी दह्याची अंघोळ घालण्यात आली. त्यानंतर दूधासोबत तिरुमंजना करणअयात आली. नंतर तेल आणि मग पाण्याने तिरुमंजना सेवा करण्यात आली. आयुर्वेदात पंचकर्म अशाच पद्धतीने केले जाते. अशा प्रकारच्या स्नानामुळे शरीरात नव्या प्रकारची ऊर्जा प्रवाहीत होते, असं स्वामींनी सांगितलं.

शेषवाहन सेवा

समता कुंभमध्ये तिसऱ्या दिवशी संध्याकाळी भगवान साकेत रामचंद्राची शेषवाहन सेवा केली जाते. भगवान श्रीमन्नारायण ज्या रुपात वैकुंठात वीससनममध्ये विराजमान आहेत, त्याच्याशी हे मिळते जुळते आहे. शेषनागाचा अर्थ आहे साक्षात रामानुज. पाच डोक्यांचा शेष हा या कलियुगात वेदातील अर्थपंचक ज्ञान शिकवण्यासाठी भगवान रामानुजच्या रुपात अवतरला आहे, असंही स्वामी म्हणाले.

कालस्पर्श दोष दूर होतो

त्यामुळे तुम्ही जर शेषवाहनावरून स्वामींचं दर्शन घेणार तर तुम्हाला आत्मा आणि परमात्म्यामधील संबंधाची माहिती मिळेल. या समता कुंभमध्ये 18 गरुड सेवासहीत शेषवाहनावर सुशोभित साकेत रामाचे दर्शन केल्यास कालसर्पदोषासारखे संकट दूर होऊन ऐश्वर्य प्राप्त होते, असंही चिन्ना जियर स्वामी यांनी स्पष्ट केलं.

'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?.
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी.
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने.
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.