यंदा लग्नाचा हंगाम केवळ 15 दिवसांचा, जाणून घ्या तारखा आणि शुभ मुहूर्त
या ऋतूत देवउठणी एकादशी 15 नोव्हेंबरला आहे, पण पहिला शुभ मुहूर्त 19 नोव्हेंबरला आणि शेवटचा मुहूर्त 13 डिसेंबरला आहे. त्यानुसार या पुढील 2 महिन्यांत केवळ 15 शुभ मुहूर्त आहेत. यानंतर पुढील वर्षी 15 जानेवारी 2022 पासून शुभ मुहूर्त सुरू होईल.
नवी दिल्ली : दिवाळी संपताच लग्नाचा हंगाम येतो आणि शुभ मुहूर्त पाहून लोक लग्नाच्या तयारीला लागतात. अशा परिस्थितीत आम्ही तुमच्यासाठी काही शुभ मुहूर्त काढले आहेत. या सीझनमध्ये 19 नोव्हेंबर ते 13 डिसेंबरपर्यंत फक्त 15 मुहूर्त आहेत. ज्या मुहूर्तांना शुभ मानले जाते त्या मुहूर्तावर विवाह अधिक होतात. हिंदूंमध्ये देवउठणी एकादशीपासून विवाह सुरू होतात. या वर्षी 15 नोव्हेंबर रोजी देवउठनी एकादशीपासून शुभ कार्याला सुरुवात होणार आहे. मात्र यावेळी लग्नाच्या वेळा कमी असल्याने बहुतांश ठिकाणी लग्नसराई, हॉटेलमध्ये हव्या त्या तारखेचे बुकिंग लोकांना होत नाही. मुहूर्ताच्या सर्व तारखा पंडितांकडेही बुक झाल्या आहेत. (This year the wedding season is only 15 days, know the auspicious moments dates)
मुहूर्त किती दिवसांचा आहे?
या ऋतूत देवउठणी एकादशी 15 नोव्हेंबरला आहे, पण पहिला शुभ मुहूर्त 19 नोव्हेंबरला आणि शेवटचा मुहूर्त 13 डिसेंबरला आहे. त्यानुसार या पुढील 2 महिन्यांत केवळ 15 शुभ मुहूर्त आहेत. यानंतर पुढील वर्षी 15 जानेवारी 2022 पासून शुभ मुहूर्त सुरू होईल. देवउठणी एकादशीला अबुझा मुहूर्तामुळे लग्नसोहळ्यांची रेलचेल असणार आहे.
हे आहेत लग्नाचे मुहूर्त
सन 2021 मध्ये नोव्हेंबर महिन्यात (19, 20, 21, 26, 28, 29 आणि 30) या 7 तारखेला शुभ मुहूर्त तयार होत आहे. याशिवाय डिसेंबर महिन्यात 8 शुभ मुहूर्त असून ते 1, 2, 5, 6, 7, 11, 12 आणि 13 तारखेला होत आहेत.
हंगामी व्यवसाय करणाऱ्यांना सुगीचे दिवस
कोरोना काळापासून प्रत्येक व्यक्तीला खूप त्रास सहन करावा लागला आहे. अशा परिस्थितीत हंगामी व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. मात्र यावेळी लग्नसराईच्या हंगामापासून लग्नमंडप, हॉटेल ते बँड, ढोल, केटरर्स, मिठाई आदींना मोठ्या आशा आहेत. मात्र, नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात मर्यादित मुहूर्त असतात. अशा स्थितीत हॉटेल, मिठाई विक्रेते आदी ठिकाणी लोकांचे मोठ्या प्रमाणात बुकिंग होत आहे. मात्र ज्यांच्या घरात लग्ने आहेत त्यांना आता मॅरेज हॉल बुक न झाल्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तीच परिस्थिती बँड-बाज, ढोलकी, घोडी आणि बग्गी लोकांची आहे. मात्र यावेळी मोकळ्या मनाने आनंद घेऊ शकतील अशी अपेक्षा आहे.
लवकर लग्न होण्यासाठी करा हे उपाय
दर गुरुवारी पिंपळ किंवा केळीच्या झाडाला जल अर्पण करून हळद, गूळ आणि हरभरा अर्पण करावा. याशिवाय या सर्व गोष्टी गाय मातेला अर्पण कराव्यात, यामुळे विवाहातील अडथळे दूर होतात.
6 मुखी रुद्राक्ष वैवाहिक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी धारण करावा. हा रुद्राक्ष धारण केल्याने विवाहात येणारे अडथळे दूर होतात.
जर एखाद्या मुलीच्या लग्नाला उशीर होत असेल तर त्यासाठी दुसऱ्या मुलीच्या लग्नाला जाऊन तिथे वधूसोबत मेहंदी लावावी. त्यामुळे लग्न लवकर होण्याची शक्यता वाढते. (This year the wedding season is only 15 days, know the auspicious moments dates)
Khel Ratna Award: नीरज चोप्रासह 11 खेळाडूंची खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस, क्रिकेटपटू मिथाली राजसह फुटबॉलपटू सुनील छेत्रीचाही समावेशhttps://t.co/Zsmyi6ibcW#NeerajChopra | #khelratna | #India | #Mithaliraj
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 27, 2021
इतर बातम्या
मुद्दलच नव्हे तर व्याजासकट एफआरपी रक्कम देण्याची कारखान्यावर नामुष्की
आता JioPhone बद्दल सुंदर पिचाईंचा मोठा खुलासा, भारतातील सर्वात स्वस्त 4G फोन लवकरच लॉन्च होणार