Pandharpur Wari 2022 : अमरावतीवरून हजारो भाविक पंढरपूरला रवाना, भाविकांसाठी विशेष रेल्वेची व्यवस्था, नवनीत राणांनी दाखवली हिरवी झेंडी
नवनीत राणा भजनात दंग झाल्या होत्या. त्यांनी भजन गायलं. भाजपच्या तुषार भारतीय यांच्या वतीनं फराळ वाटप करण्यात आलं. पांडुरंगाच्या नावानं उत्साहाचं वातावरण होतं.
अमरावती : पंढरपूरचे विठ्ठल रुख्मिणी हे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. आषाढी एकादशी निमित्ताने विठोबा रखुमाईच्या भेटीसाठी संपूर्ण वारकरी आतूर झाले आहेत. अमरावती (Amravati) जिल्ह्यातील वारकऱ्यासाठी अमरावती येथील नया अमरावती रेल्वेवरून एक विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळं जिल्ह्यातील हजारो भाविक (Bhavik) वारकरी हरीनामाच्या गजरात पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. यावेळी भाजपा नेते तुषार भारतीय व युवा स्वाभिमानचे वतीने भाविकांना मोफत फराळ देण्यात आले. यावेळी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पंढरपूरला जाणाऱ्या या विशेष रेल्वेला हिरवी झेंडी दाखवली. रेल्वे चालक व वाहकांचा सत्कार करत भाविकांना राणा दाम्पत्याने शुभेच्छा दिल्यात.
नवनीत राणा भजनात दंग
नवनीत राणा भजनात दंग झाल्या होत्या. त्यांनी भजन गायलं. भाजपच्या तुषार भारतीय यांच्या वतीनं फराळ वाटप करण्यात आलं. पांडुरंगाच्या नावानं उत्साहाचं वातावरण होतं. मध्य प्रदेशातील बैतुल येथूनही वारकरी आले होते. दोन वर्षानंतर ही वारी काढण्यात आली. कोरोनामुळं गेली दोन वर्षे वारी काढली गेली नव्हती. बळी राजा सुखी समृद्धी होऊ दे असं साकळ घातलं जाणार आहे.
महापुजेचा मान चार पुजाऱ्यांना
आषाढी एकादशीची महापूजा करण्याचा मान चार पुजाऱ्यांना मिळाला आहे. श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरातील संदीप कुलकर्णी, कृष्णा नामदास, सुनील गुरव, आष्टेकर हे पुजारी एकादशीची महापूजा करतील. मंदिर व्यवस्थापनाकडून तयारी पूर्ण झाली आहे. राज्यातील जनतेच्या वतीनं मुख्यमंत्री दरवर्षी पूजा करतात. यंदा हा मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळणार आहे.
विठुनामाचा गजर
राज्यात सर्वत्र विठुनामाचा गजर केला जात आहे. जे भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाही ते घरीचं टीव्हीवरून विठुरायाचं दर्शन घेतात. आषाढी एकादशीपासून श्रावण, भाद्रपत महिन्यात अनेक सण येतात. या सणांना उपवास व व्रतांचं महत्व आहे. उद्या, आषाढी एकादशी साजरी करण्यात येत आहे. यानिमित्त उपवास करण्याची परंपरा आहे.