Horoscope 11 May 2022 : मौल्यवान वस्तू खरेदीचा योग, आनंदाचे वातावरण
आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल ? आजचे तारे काय सांगतात. दैनिक राशी भविष्याद्वारे आजचे राशी भविष्य आणि दिवसातील घडामोडीची माहिती जाणून घ्या.
मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची रास त्याच्या जन्मतारीख आणि जन्मवेळेवर आधारित असते. ज्योतिषशास्त्रात (Astrology) 27 नक्षत्र, 9 ग्रह आणि 12 राशींचे वर्णन केले आहे. याआधारावर व्यक्तीची रास (Zodiac) ठरवली जाते. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? आजचे तारे काय म्हणतात? दैनिक राशिभविष्याद्वारे आजचे राशीभविष्य आणि संपूर्ण दिवसातील घडामोडींची माहिती जाणून घेवूया.हे राशीभविष्य (Horoscope) वाचून तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकाल. आज तुम्हाला कोणत्या आव्हानां (Challenge)चा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात. दैनंदिन राशीभविष्य वाचून तुम्ही परिस्थितीसाठी तयार होऊ शकता.
मेष –
आजच्या दिवसाची सुरुवात समाधानकारक कामाने होईल. मित्र किंवा सहकाऱ्यांसोबत फोनवर केलेले कोणतेही महत्त्वाचे संभाषण फायदेशीर ठरेल. तुम्ही तुमची कामे तुमच्या आत्मविश्वासाने आणि पूर्ण उर्जेने योग्यरित्या पार पाडू शकाल. तुमच्यासमोर अचानक काही संकटे येऊ शकतात आणि काही वेळ निरुपयोगी कामातही जाईल. कधी कधी तुमचा अतिआत्मविश्वास आणि अहंकार तुमच्या कामात अडथळा आणू शकतात हे लक्षात ठेवा. कामाच्या ठिकाणी कामाचा त्रास असल्याने तणावाचे वातावरण राहिल. मात्र लवकरच या समस्याही दूर होतील. इंपोर्ट एक्सपोर्ट संबंधित व्यवसायात फायदेशीर परिस्थिती निर्माण होतेय.
लव फोकस – गैरसमजांमुळे वैवाहिक नात्यात काही वाद निर्माण होऊ शकतात. तुमच्या नात्याशी प्रामाणिक रहा. निरुपयोगी प्रेम प्रकरणांपासून अंतर ठेवा.
खबरदारी – तब्येत ठीक राहील. अति तणावाच्या कारणांपासून स्वतःचं रक्षण करा.
शुभ रंग – गुलाबी
भाग्यवान अक्षर – र
अनुकूल क्रमांक – 5
वृषभ –
दिवसाच्या सुरुवातीला काही अडचणी येतील. परंतु तुम्ही तुमच्या आत्मविश्वासाने आणि दृढनिश्चयाने त्यांचे निराकरण देखील सहज शोधू शकाल. धार्मिक कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळेल. तुमची सकारात्मक वृत्ती तुमचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावी करेल. अनावश्यक खर्चाची स्थिती राहील. तुमचे बजेट लक्षात ठेवा. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षा संबंधित अभ्यासात अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. ग्लॅमर, कला, सौंदर्य प्रसाधने इत्यादींशी संबंधित व्यवसायात मनाप्रमाणे यश मिळेल. मात्र कर्मचाऱ्यांच्या कामांवर बारीक लक्ष ठेवा. यावेळी परदेशाशी संबंधित व्यवसायातूनही काही चांगली बातमी मिळू शकते.
लव फोकस – पती-पत्नीमधील भावनिक बंध मजबूत होतील. प्रेमप्रकरणांना कौटुंबिक मान्यता मिळाल्याने उत्साह आणि आनंदाचे वातावरण राहील.
खबरदारी – अपचन, छातीत जळजळ यासारख्या समस्या उद्भवतील. आयुर्वेदिक उपचार सर्वोत्तम ठरतील.
शुभ रंग – हिरवा
भाग्यवान अक्षर – प
अनुकूल क्रमांक – 6
मिथुन –
यावेळी ग्रहांचे स्थान खूप चांगले आहे आणि ते तुमच्या आत्मविश्वासाला आणि कार्य क्षमतेला अधिक बळ देत आहे. आज कोणतीही मौल्यवान वस्तू खरेदी करण्याचा योग आहे. कोणत्याही सामाजिक उत्सवात सन्मानित होण्याची संधी देखील मिळेल.तुमची राग आणि तापट वृत्ती तुमच्या कामात अडथळा आणू शकते. तुमची प्रतिष्ठाही कमी होईल. तुमच्या या नकारात्मक सवयी बदला. सध्या इंपोर्ट एक्सपोर्ट संबंधित व्यवसायात काही प्रमाणात तोटा होण्याची स्थिती आहे. त्यामुळे पैसे गुंतवू नका आणि काळजी घ्या. कोणतीही व्यावसायिक सहल सध्या पुढे ढकलणे उचित आहे. व्यवसायाशी संबंधित आधुनिक माहिती मिळविण्याची ही वेळ आहे.
लव फोकस – नवरा बायकोचे नाते उत्तम राहिल. तुमचं घरा आणि व्यवसायात योग्य सामंजस्य राखणं परिस्थिती चांगली ठेवेल.
खबरदारी – एसिडिटी कफ सारख्या समस्या राहतील. पाणी जास्त पित रहा.
शुभ रंग – ऑंरेज
भाग्यवान अक्षर – न
अनुकूल क्रमांक – 8