Shani pradosh| आज शनिदेवाला प्रसन्न करण्याचा शुभ योग, त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात येईल ही संधी
29 जानेवारी रोजी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी आणि शनिवार म्हणजेच शनि प्रदोष (Shani pradosh2022) जुळून येत आहे. प्रदोष सणाला दिवसभर उपवास केला जातो आणि संध्याकाळी शिवाची पूजा केली जाते.
मुंबई (मृणाल पाटील) : 29 जानेवारी रोजी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी आणि शनिवार म्हणजेच शनि प्रदोष (Shani pradosh2022) जुळून येत आहे. प्रदोष सणाला दिवसभर उपवास केला जातो आणि संध्याकाळी शिवाची पूजा केली जाते. शनिवार, 29 जानेवारी रोजी होणार्या शिवोत्सवामुळे(Shiva) हा दिवस आणखी महत्त्वाचा झाला आहे. या शुभ योगामध्ये भगवान शिव आणि शनी यांची पूजा करून व्रत पाळल्यास प्रत्येक इच्छा पूर्ण होते. सर्व प्रकारच्या पापांचाही अंत होतो. हा वर्षातील दुसरा शनि प्रदोष आहे. यानंतर 22 ऑक्टोबर आणि 5 नोव्हेंबरला शनि प्रदोष (Shani pradosh2022) चा योग तयार होईल. आजच्या दिवशी तुमच्या मनातील गोष्टी शनि देवाकडे मागून त्याची मनोभावे पुजा करुन तुम्हाला साध्य करता येतील. गुरु भगवान शिव आहेत. त्यामुळे शनि संबंधित दोष दूर करण्यासाठी आणि शनिदेवाच्या शांतीसाठी शनि प्रदोष व्रत केले जाते. शनि त्रयोदशीचे व्रत विशेषत: संतानप्राप्तीच्या इच्छेसाठी भाग्यवर्धक मानले जाते.
प्रदोष व्रताची पद्धत व्यक्तीने ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करून भगवान शंकराचे पूजन व ध्यान करून व्रताची सुरुवात करावी. त्रयोदशी म्हणजेच प्रदोष व्रतामध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. हा उपवास आहे. सकाळी लवकर गंगाजल, बिल्वपत्र, अक्षत, धूप आणि दिव्याने भगवान शंकराची पूजा करा. संध्याकाळी पुन्हा आंघोळ करून शुभ्र वस्त्रे परिधान करून शिवाची पूजा करावी.
शनि प्रदोषाचे महत्त्व गुरु भगवान शिव आहेत. त्यामुळे शनि संबंधित दोष दूर करण्यासाठी आणि शनिदेवाच्या शांतीसाठी शनि प्रदोष व्रत केले जाते. शनि त्रयोदशीचे व्रत विशेषत: संतानप्राप्तीच्या इच्छेसाठी भाग्यवर्धक मानले जाते. या व्रतामुळे शनिदेवाचा प्रकोप, शनीच्या सदेसती किंवा धैय्याचा प्रभाव कमी होतो. शनिवारी येणारा प्रदोष संपूर्ण धन देणारा आणि सर्व दुःखांपासून मुक्ती देणारा आहे. या दिवशी दशरथकृत शनि स्तोत्राचे पठण केल्याने जीवनातील शनीचे दुष्परिणाम टाळता येतात. अशी मान्यता आहे.
संबंधीत बातम्या :
Vastu | पैशाची चणचण भासतेय ? हातात आलेला पैसा टिकत नाहीये? मग घरात या गोष्टी नक्की ठेवा
Basant Panchami 2022 | वसंत पंचमीच्या दिवशी ही खास रेसिपी करा, देवी सरस्वतीची कृपा होईल