Tuesday Astro Tips | सुख-समृद्धीसाठी मंगळवारी हे उपाय करा, हनुमानजींची कृपा लाभेल
मंगळवारचा दिवस हा हनुमानजींना समर्पित आहे. राम भक्त या दिवशी भगवान हनुमानाची पूजा करतात. अनेक लोक हनुमानजीला प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी उपवास ठेवतात. मान्यता आहे की, हनुमानजी आपल्या भक्तांचे सर्व त्रास दूर करतात आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.
मुंबई : मंगळवारचा दिवस हा हनुमानजींना समर्पित आहे. राम भक्त या दिवशी भगवान हनुमानाची पूजा करतात. अनेक लोक हनुमानजीला प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी उपवास ठेवतात. मान्यता आहे की, हनुमानजी आपल्या भक्तांचे सर्व त्रास दूर करतात आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. एवढेच नाही तर मंगळवारी विशेष उपाय केल्यास कुंडलीतील मंगळाची स्थिती मजबूत होते.
मंगळवारी हनुमानजींची पूजा करावी. या दिवशी लाल रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळवारी विशेष उपाय केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतात, जाणून घ्या –
1. मंगळवारी हनुमान मंदिरात बसून राम रक्षा स्तोत्राचे पठण करणे फलदायी मानले जाते. राम रक्षा स्तोत्राचे पठण केल्याने घरात सुख आणि समृद्धी येते.
2. मंगळवारी किंवा शनिवारी हनुमानजींची पूजा केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या दोन्ही दिवशी पिंपळाच्या पानांवर चंदन किंवा कुंकवाने “श्री राम” लिहून तुमचे सर्व दुःख दूर होतात. प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी शेंदूर आणि चमेलीचे तेल हनुमानजींना अर्पण केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात.
3. मंगळवारी उपवास करणाऱ्या व्यक्तीने संध्याकाळी बुंदीचे नैवेद्य लावाले. असे केल्याने पैशांची टंचाई दूर होते. याशिवाय, हनुमानजींना केवड्याचे अत्तर आणि गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करावी.
4. मंगळवार आणि शनिवारी हनुमानजीची पूजा करून शनिदेवही प्रसन्न होतात. या दोन्ही दिवशी हनुमानजींची पूजा आणि हनुमान चालीसाचे पठण करावे. मान्यता आहे की हनुमानजींची पूजा केल्याने कुंडलीतील मंगळ आणि शनिदोषाचा प्रभाव कमी होतो.
5. जर तुम्ही आर्थिक समस्यांनी त्रस्त असाल तर रोज रामायण किंवा रामचरित्र मानसचे पठण करावे. दररोज या दोन्हीचे पठण केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. याशिवाय, हनुमानजींना दररोज धूप-अगरबत्ती आणि फुले अर्पण करावीत.
Shirdi Sai Baba | साई बाबांच्या पूजेचा महाउपाय, हा उपाय केल्याने दूर होतील सर्व संकटंhttps://t.co/ghwXpjiTbA#SaiBaba #ShirdiSaiBaba #WorshipSaiBaba
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 26, 2021
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
घरातील दैनंदिन पूजेचे हे आहेत खास नियम; अशा पूजेमुळे मिळते तत्काळ फळ
कष्ट करूनही आर्थिक समस्या दूर होत नाहीत ? मग माता लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी करा हे उपाय