Tulsi Mala : तुळशीची माळ घालतल्यावर या नियमांकडे करू नका दुर्लक्ष, होतील नकारात्मक परिणाम
ज्योतिषशास्त्रानुसार गळ्यात घालायची जपमाळ आणि जप करण्याची जपमाळ एकच नसावी. त्या दोन्ही वेगवेळ्या असाव्या. यासोबतच जे लोकं गळ्यात तुळशीची माळ घालतात त्यांनी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी.
मुंबई : हिंदू धर्मात तुळशीच्या माळाचे (Tulsi Mala Rules) विशेष महत्त्व सांगितले जाते. तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मी देवी वास करते असे म्हणतात. तुळशीच्या माळेने भगवान विष्णूच्या मंत्राचा जप खूप फलदायी असल्याचे सांगितले जाते. तुळशीच्या माळाने जप केल्याने भगवान श्री हरी लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात अशी मान्यता आहे. दुसरीकडे ही माळ गळ्यात घातली तर मन आणि आत्मा दोन्हीमध्ये शुद्धता येते. यासोबतच मनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.
ज्योतिषशास्त्रानुसार गळ्यात घालायची जपमाळ आणि जप करण्याची जपमाळ एकच नसावी. त्या दोन्ही वेगवेळ्या असाव्या. यासोबतच जे लोकं गळ्यात तुळशीची माळ घालतात त्यांनी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. या गोष्टींची काळजी न घेतल्यास माता लक्ष्मी आणि श्री हरी यांच्या नाराजीला सामोरे जावे लागते. जाणून घेऊया तुळशीची माळ घालण्याचे नियम.
तुळशीची माळ धारण करण्यापूर्वी जाणून घ्या नियम
- ज्योतिषशास्त्रानुसार तुळशी दोन प्रकारची असते. रामा तुळशी आणि श्यामा तुळशी. या दोन्हींचा परिणाम वेगळा आहे.
- तुळशीची माळ घातल्यानंतर अनेक कठोर नियमांचे पालन करावे, असे म्हटले जाते. त्या व्यक्तीने सात्विक अन्नच खावे. मांस-दारू इ.पासून दूर राहा. तसेच लसूण-कांदा इत्यादींचे सेवन टाळावे.
- असे मानले जाते की, जर तुम्ही तुळशीची माळ घातली असेल तर ती चुकूनही काढू नये.
- तुळशीची माळ धारण करण्यापूर्वी गंगेच्या पाण्याने नीट धुवावी. यानंतर ते कोरडे झाल्यावर घाला.
- चुकूनही तुळशीच्या माळासोबत रुद्राक्ष धारण करू नये. यामुळे शुभ परिणाम मिळत नाही.
- गळ्यात तुळशीची माळ घालता येत नसेल तर उजव्या हातातही घालता येईल. मात्र नित्यक्रमापूर्वी माळ काढावी व आंघोळीनंतर पुन्हा गंगेच्या पाण्याने धुवून ते परिधान करावी.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
LIVE NEWS & UPDATES
-
बीसीसीआयचा ‘तो’ एक निर्णय अन् रिषभ पंतची IPL मध्ये एन्ट्री!
बीसीसीआयने परवानगी दिली तर पंतला दिल्लीच्या घरगुती सामन्यांमध्ये डगआऊटमध्ये बसता येणार- दिल्ली कॅपिटल्सचे सीईओ धीरज मल्होत्रा यांनी सांगितलं.
Published On - Mar 08,2023 12:19 PM