Tulsi Pooja: तुळशीची पूजा करताना ‘या’ नियमांचे अवश्य करा पालन, मिळेल भरपूर लाभ
यासाठीच विष्णूंची पूजा तुळशीभोगाशिवाय अपूर्ण मानली जाते. अशा वेळी तुळशीची पूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
सनातन धर्मात पुजली जाणारी तुळशी (Tulsi Pooja) अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण मानली जाते. याला जेवढं धार्मिक महत्त्व आहे, तेवढंच महत्त्व आयुर्वेदातही (Ayurveda) आहे. तुळशीची पानं तोडणं, तिला पाणी अर्पण करणं, पूजा करण्याचे अनेक नियम धार्मिक ग्रंथांमध्येही सापडतात. भगवान शिव यांना वगळून तुळशीचा उपयोग जवळजवळ प्रत्येक हिंदू देवतांच्या पूजेत केला जातो. तुळशीमध्ये लक्ष्मीचा वास असल्याचं मानतात. यासाठीच विष्णूंची पूजा तुळशीभोगाशिवाय अपूर्ण मानली जाते. अशा वेळी तुळशीची पूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पूजन करताना काही चुका केल्या तर यामुळे तुम्हाला नुकसान होऊ शकतं. त्यामुळे आज आपण तुळशीला पाणी घालण्याच्या नियमांबद्दल जाणून घेणार आहोत.
या नियमांचे करा पालन
- तुलशीला पाणी अर्पण करण्यापूर्वी कोणत्याही प्रकारचं अन्न ग्रहण करु नये.
- धार्मिक शास्त्रानुसार, तुळशीला पाणी अर्पण करताना न शिवलेले कपडे घालण्याचा सल्ला दिला जातो.
- सूर्योदयाच्या वेळी तुळशीला पाणी अर्पण करणं उत्तम मानले जाते. अंघोळ केल्याशिवाय कधीच तुळशीला जल अर्पण करू नये.
- तुळशीच्या रोपाला पाणी घालत असताना ते गरजेपेक्षा जास्त असून याकडे विशेष लक्ष द्यावे. इतर कोणत्याही गोष्टींकडे त्यावेळी लक्ष देऊ नये.
- रविवारी आणि एकादशीला तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करू नये. असे मानले जातं की, एकादशीच्या दिवशी तुळशीमाता भगवान विष्णूसाठी निर्जला व्रत करते.
या मंत्रांचा करा जप
धार्मिक ग्रंथांनुसार जर तुळशीला पाणी घालताना ‘ॐ’ या मंत्राचे 11 किंवा 21 वेळा जप केला, तर वाईट नजरेपासून बचाव होतो. त्याचबरोबर, घरात धन व धान्य यांची वृद्धि होते. विष्णु भगवानच्या पूजेला तुळशीची पाने अर्पण करण्यासाठी तुळशीची पाने तोडतांना “ॐ सुभद्राय नम:, मातस्तुलसि गोविन्द हृदयानन्द कारिणी,नारायणस्य पूजार्थं चिनोमि त्वां नमोस्तुते। या मंत्राचा जप करावा. यामुळे पूजेचा दुहेरी फायदा मिळतो.
जीवनात सफल किंवा यशस्वी होण्यासाठी- महाप्रसाद जननी, सर्व सौभाग्यवर्धिनी, आधि व्याधि हरा नित्यं, तुलसी त्वं नमोस्तुते। मंत्राचा जप करावा.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)