12 की 13 नोव्हेंबर, तुळशी विवाह नेमका कधी?  जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त अन् सर्व माहिती…

दिवाळी झाल्यानंतर देवउठणी एकादशीच्या दिवशी तुळशीविवाह साजरा केला जातो. या दिवसाला देवोत्थान एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असे म्हणतात. चला तर मग तुळशी विवाहाची तारीख, मुहूर्त आणि महत्त्व जाणून घेऊयात.

12 की 13 नोव्हेंबर, तुळशी विवाह नेमका कधी?  जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त अन् सर्व माहिती...
तुळसी विवाह
Follow us
| Updated on: Nov 08, 2024 | 5:05 PM
Tulsi Vivah 2024 Details : आपल्या हिंदू धर्मात तुळशीला माता लक्ष्मी समजून तिचे पूजन केले जाते. त्याचबरोबर तुळशीचे दुसरे नावही विष्णुप्रिया आहे. कारण तुळशी माता विष्णूची पत्नी मानली जाते. दरवर्षीप्रमाणे कार्तिक शुक्ल पक्षाच्या बाराव्या दिवशी तुळशी विवाह सोहळा संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो.

दिवाळी झाल्यानंतर देवउठणी एकादशीच्या दिवशी तुळशीविवाह साजरा केला जातो. या नंतर लग्नसराईला सुरुवात होते. देवउठणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांनी योगनिद्रातून जागे होतात आणि या दिवसापासून चातुर्मास संपतो. या दिवसाला देवोत्थान एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असे म्हणतात. चला तर मग तुळशी विवाहाची तारीख, मुहूर्त आणि महत्त्व जाणून घेऊयात.

तुळशी विवाह सोहळ्याची तारीख

यंदा तुळशी विवाह १३ नोव्हेंबर २०२४ रोजी पार पडणार आहे. एक दिवस अगोदर म्हणजे १२ नोव्हेंबरला देवउठनी एकादशी चातुर्मासाची सांगता आहे. या दिवशी भगवान विष्णूचा तुळशीशी शालिग्राम स्वरूपात विवाह करण्याची ही परंपरा आहे.

तुळशी विवाह २०२४ मुहूर्त

पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वादशी तिथी १२ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ०४ वाजून ०४ मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी १३ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ०१ वाजून ०१ मिनिटांनी संपेल.

देवउठणी एकादशीला तुळशी विवाह मुहूर्त

मान्यतेनुसार काही लोकं देवउठणी एकादशीच्या संध्याकाळी तुळशी आणि शालिग्रामच्या विवाहाची परंपरा पार पाडतात. या दिवशी तुळशी विवाहाचा मुहूर्त सायंकाळी ०५वाजून २९ मिनिटांनी सुरु होऊन ०५ वाजून ५५ मिनिटांनी संपेल.

तुळशी विवाहाचे महत्व

हिंदू धर्मात कन्यादानाला महादानाच्या श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. असे मानले जाते की जे लोकं तुळशी विवाहाची परंपरा पाळतात, त्यांना कन्यादानासारखेच फळ मिळते. तुळशीविवाह घराच्या अंगणात करावा. यासाठी सूर्यास्तानंतरची संध्याकाळची वेळ निवडा. असे मानले जाते की ज्या घरात शालिग्राम जी (भगवान विष्णु) आणि तुळशी मातेचा विवाह होतो त्या घरात लक्ष्मीचा वास असतो.

विष्णूने तुळशीशी विवाह का केला?

पौराणिक कथेनुसार, एकेकाळी राक्षसांचा राजा जालंधर याने तिन्ही लोकांमध्ये दहशत निर्माण केली होती. पत्नी वृंदाच्या एकनिष्ठ असल्यामुळे तो अजिंक्य होता. असे म्हणतात की यामुळे भगवान विष्णूने एक युक्ती केली आणि जालंधरचे रूप धारण केले. वृंदाने आपल्या पत्नीशी निष्ठा ठेवण्याचे व्रत मोडले गेले, परिणामी जालंधर भगवान शिवाच्या हातून मारला गेला.

पवित्रतेचे व्रत मोडून आणि अपवित्र झाल्यानंतर, वृंदाने प्राण त्याग केला. त्यानंतर भगवान विष्णूला दगड बनण्याचा शापही दिला. भगवान विष्णूच्या या रूपाला ‘शाळीग्राम’ म्हणतात. वृंदाने प्राण त्याग केलेल्या ठिकाणी तुळशीचे रोप दिसले. भगवान विष्णूंनी वरदान दिले की तुळशीचा विवाह त्यांच्या शालिग्राम रुपाशी होईल आणि तुळशीशिवाय त्यांची पूजा अपूर्ण राहील. तेव्हापासून विष्णूच्या रूपातील शालिग्रामचा विवाह वृंदा म्हणजेच तुळशीशी होतो.

Non Stop LIVE Update
शरद पवारांचे वारसदार कोण? दादा मिश्कीलपणे म्हणाले, 'मी रतन टाटांचा...'
शरद पवारांचे वारसदार कोण? दादा मिश्कीलपणे म्हणाले, 'मी रतन टाटांचा...'.
'लाडकी बहिण'वर अजित पवार स्पष्टच म्हणाले, 'सरकारने ठरवलं तर...'
'लाडकी बहिण'वर अजित पवार स्पष्टच म्हणाले, 'सरकारने ठरवलं तर...'.
अजित पवारांचे भाजपसोबत सूर जुळले की नाही? दादा स्पष्टच म्हणाले...
अजित पवारांचे भाजपसोबत सूर जुळले की नाही? दादा स्पष्टच म्हणाले....
ओ बारामतीच्या मोठ्ठ्या ताई.. फडणवीसांवरील टीकेवरून वाघांचं प्रत्युत्तर
ओ बारामतीच्या मोठ्ठ्या ताई.. फडणवीसांवरील टीकेवरून वाघांचं प्रत्युत्तर.
'मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी...', खोत-फडणवीसांवर रोहित पवारांची टीका
'मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी...', खोत-फडणवीसांवर रोहित पवारांची टीका.
'राज ठाकरे आणि आम्ही आता एकत्र नाही', भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य
'राज ठाकरे आणि आम्ही आता एकत्र नाही', भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य.
भुजबळांनी ‘द इलेक्शन दॅट...’ पुस्तकातील दावे फेटाळले अन् दिला इशारा
भुजबळांनी ‘द इलेक्शन दॅट...’ पुस्तकातील दावे फेटाळले अन् दिला इशारा.
सत्तेची समीकरणे बदलणार?, मलिकांनंतर अजित दादांच्या नेत्याच मोठ वक्तव्य
सत्तेची समीकरणे बदलणार?, मलिकांनंतर अजित दादांच्या नेत्याच मोठ वक्तव्य.
महायुती तर गती आणि उद्धव ठाकरेच खरा नेता, मुंबईत कुठे रंगलंय बॅनरवॉर?
महायुती तर गती आणि उद्धव ठाकरेच खरा नेता, मुंबईत कुठे रंगलंय बॅनरवॉर?.
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला शेलारांची दांडी,अमित ठाकरेंसोबत भाजप?
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला शेलारांची दांडी,अमित ठाकरेंसोबत भाजप?.