गरुड पुराणातील या गोष्टी समजून घेतल्यास आयुष्यातील सर्व दु:ख होतील दूर
गरुड पुराणातही तुळशीच्या रोपाचे महत्त्व सांगितले गेले आहे. तुळशीला पूज्यनीय मानण्यात आले आहे. असे म्हणतात की, मरणापूर्वी त्या व्यक्तीजवळ तुळशीची पाने असतील, तर त्या व्यक्तीला मृत्यूनंतर मोक्ष मिळतो.
नवी दिल्ली : गरुड पुराणाला 18 पुराणांपैकी एक मानले जाते. याला महापुराण असे नाव देण्यात आले आहे. गरुड पुराणातील प्रमुख देवता भगवान विष्णू आहेत. गरुड पुराण केवळ मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या परिस्थितीबद्दलच सांगत नाही, तर ते निती-नियम, सदाचार, ज्ञान, त्याग, तपस्या इत्यादींचे महत्त्व देखील सांगते. गरुड पुराणात जीवन व्यवस्थापनाच्या अशा गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत, ज्या गोष्टी एखाद्या व्यक्तीने आत्मसात केल्या, तर त्या व्यक्तीचे जीवन खूप आनंदी आणि सोपे होऊ शकते. त्या व्यक्तीला मृत्यूनंतरही मोक्ष मिळू शकतो. (Understanding these things in Garuda Purana will take away all the sorrows in life)
भगवान विष्णूच्या आश्रयाला जा
भगवान विष्णू हा सर्व जगाचा आधारकर्ता मानला जातो. म्हणूनच तो तुमची सर्व दु:खे दूर करु शकतो. जी व्यक्ती आपल्या दिवसाची सुरुवात श्री हरीच्या नावाने करते तसेच जी व्यक्ती नेहमी परमेश्वराच्या भक्तीमध्ये लीन होते, त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व समस्या आपोआप सुटतात. जर तुम्हाला दु:खांपासून मुक्ती हवी असेल तर भगवान विष्णूच्या आश्रयाला जा.
तुळशीची पूजा करा
गरुड पुराणातही तुळशीच्या रोपाचे महत्त्व सांगितले गेले आहे. तुळशीला पूज्यनीय मानण्यात आले आहे. असे म्हणतात की, मरणापूर्वी त्या व्यक्तीजवळ तुळशीची पाने असतील, तर त्या व्यक्तीला मृत्यूनंतर मोक्ष मिळतो. आपल्या घरामध्ये तुळशीचे रोप अवश्य ठेवले पाहिजे. तसेच दररोज त्या रोपाची पूजा केली पाहिजे. यामुळे तुम्हाला वेळोवेळी चांगल्या गोष्टींची प्रचिती येईल.
एकादशीचा उपवास
एकादशी हा शास्त्रातील सर्वोत्तम उपवास मानला जातो. गरुड पुराणातही या व्रताचा महिमा वर्णन करण्यात आला आहे. हे व्रत भगवान विष्णूला समर्पित आहे. असे मानले जाते की एकादशीचे व्रत केल्यास सर्व पापांचा अंत होतो आणि व्यक्ती मोक्षाकडे वाटचाल करते. म्हणून शक्य असल्यास एकादशीचे व्रत करा. पूर्ण विधीसह हे व्रत केल्यास हा उपवास यशस्वी होतो, असे म्हटले जाते.
मोक्षदायनी आहे गंगा
गरुड पुराणात गंगा नदीचे मोक्षदायनी असे वर्णन करण्यात आले आहे. कलियुगात गंगा नदीचे पाणी सर्वात पवित्र मानले जाते. यामुळेच विशेष धार्मिक कामांमध्ये गंगाजलचा उपयोग केला जातो. प्रत्येकाने आपल्या घरात गंगाजल अवश्य ठेवले पाहिजे. तसेच वेळोवेळी गंगा स्नानही केले पाहिजे. (Understanding these things in Garuda Purana will take away all the sorrows in life)
साध्या, सात्विक विचारसरणीचा मापदंड राजकारणात निर्माण करणारे व्यक्तिमत्व हरपले : मुख्यमंत्रीhttps://t.co/DKdHu1gGgk#GanpatraoDeshmukh #CMUddhavThackeray #Maharashtra #Solapur #Sangola @CMOMaharashtra @OfficeofUT
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 30, 2021
इतर बातम्या
श्रावण महिन्यात सुवासिनींनी या 6 गोष्टी कराव्यात; अखंड सौभाग्यप्राप्ती होते !