एक मंदिर असं जिथे चपलांची माळ अर्पण करुन नवस मागतात, जाणून घ्या या मंदिराबाबत

आज आम्ही तुम्हाला अशाच अनोख्या मंदिराबद्दल सांगणार आहोत, जिथे भक्त देवाला संतुष्ट करण्यासाठी चपलांचा हार घालतात आणि नवस मागतात. हे मंदिर कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यात आहे. लक्कम्मा देवी मंदिर असं या मंदिराचं नाव आहे. दरवर्षी येथे पादत्राणे महोत्सव आयोजित केला जातो, ज्यात मोठ्या संख्येने भाविक चपलांची माळा घेऊन येथे येतात. | Unique temple where people offer garland of slippers

एक मंदिर असं जिथे चपलांची माळ अर्पण करुन नवस मागतात, जाणून घ्या या मंदिराबाबत
UNIQUE TEMPLE
Follow us
| Updated on: Jul 01, 2021 | 12:37 PM

मुंबई : मंदिर अत्यंत पवित्र स्थान मानले जाते, म्हणून जेव्हाही लोक मंदिरात जातात देतात तेव्हा फुलांचे हार आणि इतर गोष्टी परमेश्वराला अर्पण करण्यासाठी नेतात. शूज आणि चप्पल नेहमीच मंदिराबाहेर काढली जातात. जरी ही पादत्राणे नवीन असली तरीही त्यांचे स्थान नेहमीच मंदिर किंवा उपासनास्थळाच्या बाहेर असते (Unique temple where people offer garland of slippers to Goddess Lakamma Devi In Karnataka).

परंतु, आज आम्ही तुम्हाला अशाच अनोख्या मंदिराबद्दल सांगणार आहोत, जिथे भक्त देवाला संतुष्ट करण्यासाठी चपलांचा हार घालतात आणि नवस मागतात. हे मंदिर कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यात आहे. लक्कम्मा देवी मंदिर असं या मंदिराचं नाव आहे. दरवर्षी येथे पादत्राणे महोत्सव आयोजित केला जातो, ज्यात मोठ्या संख्येने भाविक चपलांची माळा घेऊन येथे येतात. या अनोख्या मंदिराशी संबंधित मनोरंजक गोष्टी जाणून घ्या.

दिवाळीच्या सहाव्या दिवशी उत्सव

दिवाळीच्या सहाव्या दिवशी दरवर्षी फुटवेअर महोत्सवाचे आयोजन केले जाते. लोक या उत्सवाची मोठ्या उत्सुकतेने प्रतिक्षा करतात. या दिवशी लोक येथे चपलची माळ घेऊन येतात आणि देवीसमोर आपली मनोकामना व्यक्त करतात. यानंतर झाडावर चपलांची माळ घालून तेथून निघून जातात.

मान्यता काय?

लकम्मा देवीच्या भाविकांच्यामते चपलांची माळ अर्पण केल्याने देवी सर्व मनोकामना पूर्ण करते. त्ंयांनी अर्पण केलेली चपलांची माळ घालून देवी रात्रभर फिरते आणि दुष्ट शक्तींपासून त्यांची रक्षा करते. मान्यता आहे की येथे चपला अर्पण केल्याने पायाचे आणि गुडघे दुखण्याचा त्रास कायमचा दूर होतो.

बैलांचा बळी थांबवल्यानंतर हा उत्सव सुरु झाला

सांगण्यात येते की या मंदिरात देवीला बैलांचा बळी दिला जात होता. परंतु जनावरांचा बळी थांबविल्यानंतर येथे फुटविअर महोत्सव सुरु झाला. फुटवेअर फेस्टिव्हलच्या दिवशी देवीचे भक्त येथे येतात आणि त्यांच्या श्रद्धेनुसार देवीला शाकाहारी आणि मांसाहारी नैवेद्य दाखवतात.

Unique temple where people offer garland of slippers to Goddess Lakamma Devi In Karnataka

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Ashadha Amavasya 2021 | आषाढ अमावस्या कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधि आणि महत्व

Pradosh Vrat 2021 | आषाढ महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्त्व आणि पूजा विधी

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.