Utpanna Ekadashi 2021 | या एकादशीचे महत्त्व आणि पूजा करण्याची पद्धत जाणून घ्या एका क्लिकवर
हिंदू धर्मामध्ये एकादशी या दिवसाला विशेष महत्त्व प्रप्त झाले आहे. पुराणानुसार हा धर्म भगवान विष्णूला समर्पित करण्यात आला आहे. संपूर्ण वर्षामध्ये 24 एकादशी असतात, त्यांपैकी प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात.
मुंबई : हिंदू धर्मामध्ये एकादशी या दिवसाला विशेष महत्त्व प्रप्त झाले आहे. पुराणानुसार हा धर्म भगवान विष्णूला समर्पित करण्यात आला आहे. संपूर्ण वर्षामध्ये 24 एकादशी असतात, त्यांपैकी प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात. या महिन्याच्या 30 नोव्हेंबर 2021 रोजी उत्पत्ती एकादशी साजरी केली जाणार आहे. हिंदू महिन्यानुसार कार्तिक पौर्णिमेनंतर कृष्ण पक्षातील मार्गशीर्ष महिन्यात ही एकादशी साजरी केली जाते. या दिवशी भगवान विष्णूंची मनोभावे पूजा केली जाते.
उत्पत्ती एकादशी 2021: तारीख आणि शुभ वेळ
तारीख : ३० नोव्हेंबर, मंगळवार
एकादशी तिथी सुरू होते – 30 नोव्हेंबर 2021 सकाळी 04:13 वाजता
एकादशी तिथी संपेल – ०1 डिसेंबर 2021 मध्यरात्री 2.13 वाजता
पारणाची वेळ – ०1 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 07:34 ते सकाळी 9.02
उत्पत्ती एकादशी 2021: महत्त्व या दिवशी भगवान विष्णूनी मूर नावच्या दानवाचा वध केला होता. या राक्षसाने भगवान विष्णूना झोपेतून मारण्याचा प्रयत्न केला. पण भगवान विष्णूच्या शक्तींनी त्यांनी या दानवाचा वध केला.
उत्पत्ती उपासनेची पद्धत या दिवशी ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. या दिवशी भगवान विष्णूची मनोभावे पूजा करा. यावेळी तुम्ही विष्णु सहस्रनामाचा पाठ करू शकता.
संबंधित बातम्या :
Easy Vastu Tips | हे सोपे उपाय करा, घरातील वास्तू दोष दूर होतील
PHOTO | Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार घरात लावा ‘ही’ 5 झाडे, मिळेल सुख-समृद्धी