Vaishakh Amavasya 2021 | पितरांच्या मोक्षसाठी, कालसर्प दोष मुक्तीसाठी वैशाख अमावस्येला ‘हे’ उपाय करा
वैशाख महिना धार्मिक दृष्टीकोनातून खूप पवित्र महिना मानला जातो (Vaishakh Amavasya 2021). या महिन्यात भगवान विष्णू आणि शिव यांची पूजा केली जाते. मान्यता आहे की असे केल्याने त्रिदेवचे आशीर्वाद प्राप्त होतात.
मुंबई : वैशाख महिना धार्मिक दृष्टीकोनातून खूप पवित्र महिना मानला जातो (Vaishakh Amavasya 2021). या महिन्यात भगवान विष्णू आणि शिव यांची पूजा केली जाते. मान्यता आहे की असे केल्याने त्रिदेवचे आशीर्वाद प्राप्त होतात. या महिन्यात गंगा उपासना, वरुथिनी एकादशी, मोहिनी एकादशी, सीता नवमी, अक्षय तृतीया, वैशाख पौर्णिमा आणि वैशाख अमावस्या असे अनेक व्रत आणि सण देखील येतात. असा विश्वास आहे की त्रेतायुग देखील वैशाख महिन्यापासूनच सुरु झाला होता (Vaishakh Amavasya 2021 Do These Upay For Salvation Of Pitru And Kaal Sarp Dosh Mukti).
यावेळी वैशाख अमावस्या 11 मे 2021 रोजी असेल. वैशाख अमावस्येचा दिवस पूर्वज आणि काल सर्प दोष निवारणासाठी खूप शुभ मानला जातो. शास्त्रात या अमावस्येचे वर्णन पितरांसाठी मोक्षदायिनी असे करण्यात आलं आहे. यावेळी वैशाख अमावस्येला सौभाग्य आणि शोभन असे दोन शुभ योग बनत आहेत. अशा परिस्थितीत पितरांच्या मोक्षसाठी आणि काल सर्पातून मुक्तीसाठी हे उपाय करा.
पिरतांच्या मोक्ष प्राप्तीसाठी
1. पूर्वजांच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून अमावस्येच्या दिवशी व्रत करा आणि तर्पण करा. पितरांच्या मोक्ष प्राप्तीसाठी नारायणाला प्रार्थना करत गीतेचा सातवा अध्यायाचं पठन करा. यानंतर एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला भोजन द्या, कपडे द्या आणि क्षमतेनुसार दान-दक्षिणा द्या.
2. नदी, जलाशय किंवा तलावामध्ये स्नान करुन सूर्यदेवाला अर्घ्य द्या. यानंतर, वाहत्या पाण्यात काळी तीळ प्रवाहित करा.
3. सकाळी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. यासह पितरांच्या शांतीसाठी देवाकडे प्रार्थना करा. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने पिंपळाला स्वतःचे रुप असल्याचे वर्णन केले आहे.
काल सर्प दोष निवारणासाठी हे उपाय करा
1. भगवान शिव यांना दुधाने अभिषेक करा. यानंतर, त्यांना एक चांदीचा नाग आणि एक नाग-नागिनची जोडी अर्पण करा.
2. एखाद्या गारुडीकडून जिवंत नाग आणि नागिनची जोडी खरेदी करा आणि त्यांना जंगलात मुक्त करा.
3. नव नाग स्तोत्राचं 108 वेळा पठन करा. यानंतर वाहत्या पाण्यात 11 नारळ प्रवाहित करा. असे केल्याने कल सर्प दोषातून मुक्ती मिळते.
Shani Trayodashi | दारिद्र्यातून मुक्ती, संतती सुख हवे असेल तर शनि त्रयोदशीला ‘हे’ उपाय कराhttps://t.co/SksNctvej6#ShaniTrayodashi
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 7, 2021
Vaishakh Amavasya 2021 Do These Upay For Salvation Of Pitru And Kaal Sarp Dosh Mukti
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Lord Vishnu | भगवान शंकराने विष्णूंच्या पुत्रांचा वध केला होता, जाणून घ्या ही पौराणिक कथा