darsh amavasya 2025: यंदा वैशाख महिन्यात दर्श अमावस्येला 1-2 नाही तर 4 मोठे योग
Darsh Amavasya Durmil Yog: यंदा वैशाख दर्शन अमावस्येला 1 किंवा 2 नव्हे तर 4 दुर्मिळ महासंयोग एकत्र होत आहेत, ज्यामुळे ही अमावस्या विशेष होत आहे. या दिवशी तुम्ही केलेल्या चांगल्या कर्मांचे तुम्हाला अनेक पटीने जास्त फायदे मिळतील.

अमावस्येचा किंवा त्यानंतरचे काही दिसव अत्यंत अशुभ मानले जातात. या दिवशी कोणत्याही प्रकारचे शुभकार्य केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये अडथळे निर्माण होत नाहीत. वैशाख अमावस्येच्या दिवशी किंवा तेव्हा वेळ पाळता आली नाही तर त्यानंतरच्या दोन ते तीन दिवसांनंतर काही विशेष उपाय केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होण्यास मदत होते. हिंदू धर्मात वैशाख महिना उपासनेसाठी अतिशय योग्य असल्याचे म्हटले जाते. जरी संपूर्ण वैशाख महिन्यात असे अनेक सण, उत्सव आणि अशा तारखा असतात ज्यांच्या पूजेला खूप महत्त्व असते, परंतु जर तुमच्या आयुष्यात तुमचे पूर्वज तुमच्यावर रागावले असतील किंवा तुमचे काम पूर्ण होण्यापूर्वीच बिघडले असेल तर या महिन्याची अमावस्या तुमच्यासाठी खास असेल.
वैशाख महिन्यातील अमावस्येला किंवा त्यानंतरच्या दोन ते तीन दिवसांमध्ये तुम्ही काही विशेष उपाय केल्यामुळे सकारात्मक फायदे होण्यास मदत होते. यावेळी अमावस्येला असे मोठे योगायोग घडत आहेत, असे शुभ योग घडत आहेत. तुम्ही तुमच्या पूर्वजांना संतुष्ट करू शकता. तुम्ही तुमच्या कालसर्प दोषाची पूजा करू शकता आणि तुमच्या घरात आनंद, समृद्धी आणि आशीर्वाद वाढवू शकता.
येत्या 27 आणि 28 तारखेला वैशाख अमावस्या आहे आणि या दिवशी एक-दोन नव्हे तर चार दुर्मिळ योग एकत्र आले. या दिवशी अनेक शुभ योगायोग घडतात असं म्हटलं जातं. या दिवशी प्रीती योग, सर्वथ सिद्धी योग तसेच शिववास योग तयार होत आहेत, यासोबतच, या दिवशी अश्विनी नक्षत्राचे संयोजन देखील तयार होत आहे जे अत्यंत दुर्मिळ होतं. यावेळी वैशाख महिन्यात अत्यंत दुर्मिळ योगायोग घडत आहेत. वैशाख अमावस्येला रात्री उशिरापर्यंत प्रीति योग असतो. या योगात केलेले काम खूप फायदेशीर आहे.
कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हे योग अनुकूल मानले जातात. याशिवाय, या अमावस्येला शिववास योग देखील तयार होत आहे. या योगात पूजा करणे खूप फलदायी असते असे म्हटले जाते. शिववास योगात महादेवाची पूजा करण्याची एक विशेष पद्धत वर्णन केली आहे.
‘या’ अमावस्यानंतरही बऱ्याच दिवसांपर्यंत या शुभ योगांचा प्रभाव राहतो.
ब्रह्म मुहूर्त – पहाटे 4:17 ते 5:00 वाजेपर्यंत विजय मुहूर्त – दुपारी 02:31 ते 03:23 पर्यंत संधिप्रकाश वेळ – संध्याकाळी 6:43 ते 7:14 पर्यंत निशिता मुहूर्त – दुपारी 11:57 ते 12:40 पर्यंत
हे असे शुभ मुहूर्त आहेत ज्यांचा तुम्ही कधीही लाभ घेऊ शकता.
डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.