तुळशीचे महत्त्व काय, वैशाख महिन्यात लावल्यावर नेमकं काय होतं?
Vaishakh Month 2025 Tulsi upay in marathi: हिंदू नववर्षाच्या दुसऱ्या महिन्यात वैशाख महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात, तुळशीच्या मदतीने काही सोपे आणि प्रभावी उपाय केल्याने, देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि व्यक्तीला सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देते.

हिंदू धर्मात तुळशीचे रोप अतिशय पवित्र आणि पूजनीय मानले जाते. तुमच्या घरामध्ये तुळशीचं रोप लावल्यामुळे सकारात्मकता वाढते त्यासोबतच आनंद आणि समृद्धी येते. आता लवकरच वैशाख महिना सुरु होणार आहे. धार्मिकदृष्ट्या, शास्त्रांमध्ये वैशाख महिन्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. स्कंद पुराणात वैशाख महिना सर्व महिन्यांत सर्वोत्तम असल्याचे म्हटले जाते. या महिन्यात जो कोणी सकाळी स्नान करून भगवान विष्णूची पूजा करतो, त्याला आशीर्वाद मिळतो. एवढेच नाही तर वैशाख महिन्यात तुळस लावल्यास घरातील गरिबी दूर होते. तसेच, घरात सुख आणि समृद्धी येते. ज्योतिषशास्रानुसार, या महिन्यात घरामध्ये तुळशीचे रोप लावल्यामुळे घरातील सदस्यांमध्ये मतभेद वाढत नाहीत.
हिंदू नववर्षाचा दुसरा महिना म्हणजे वैशाख. येत्या २१ एप्रिलपासून वैशाख महिना सुरु होणार आहे. २१ मे 2025 रोजी वैशाख महिना संपेल. नारद ऋषींनी ब्रह्मदेवाकडून पुष्टी केली की ‘वैशाख मास’ हा एक प्रचंड महत्त्वाचा महिना आहे. कारण तो मानवांच्या सर्व इच्छा पूर्ण करतो ज्याप्रमाणे आई मुलांची इच्छा पूर्ण करते . हा महिना विष्णूंना खूप प्रिय आहे आणि पात्रांना अनेक वरदान देतो. हा महिना धर्म, यज्ञ, क्रिया आणि तपस्येचे सार आहे.
वैशाख महिन्यातील उपाय….
वैशाख महिन्यात भगवान विष्णू आणि तुळशीच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे. गुरुवार हा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला समर्पित आहे. अशा परिस्थितीत, वैशाख महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी विशेष पूजा केल्याने भाविकांना विशेष लाभ मिळतो.
स्कंद पुराणानुसार, वैशाख महिन्यात तुळशीची 5 पाने घेऊन पिंपळाच्या झाडाला 5 वेळा प्रदक्षिणा घालावी. यामुळे व्यक्तीला वैकुंठाची प्राप्ती होते. तसेच, व्यक्तीला जीवनातील सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्तता मिळते. याशिवाय घरात संपत्ती वाढते.
वैशाख महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ पीठाचा दिवा लाववा. त्यात तुपाची वात ठेवली. यामुळे तुळस खूप प्रसन्न होते.
तुळशीचे महत्त्व….
तुळस ही हिंदू धर्मात एक पवित्र वनस्पती मानले जाते. तिची पूजा केली जाते. ती लक्ष्मीचा अवतार मानली जाते. तुळस विशेषतः विष्णू आणि त्याचे रूप कृष्ण आणि विठोबा यांच्या पूजेत पवित्र मानली जाते. असे मानले जाते की ज्या घरात तुळशीचे रोप असते, तेथे वास्तुदोषांचा प्रभाव राहत नाही. सुख-समृद्धी टिकून राहते. तुळशीमध्ये अँटिऑक्सिडंट्स, दाहक-विरोधी गुणधर्म आणि इतर अनेक औषधी गुणधर्म असतात.
तुळशीचा उपयोग सर्दी, खोकला, श्वसन संक्रमण, रोगप्रतिकार शक्ती वाढवणे, पचन सुधारणे, तणाव कमी करणे आणि रक्त शुद्ध करणे यांसारख्या विविध समस्यांवर होतो. तुळशी रोगप्रतिकार शक्ती वाढवते. ज्यामुळे विविध रोगांपासून संरक्षण होते.
डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.