Varlakshmi Vratham 2022: वरलक्ष्मी व्रताने होते दारिद्र्य दूर, मुहूर्त आणि महत्त्व
असे मानले जाते की, माता वरलक्ष्मीचे हे व्रत पाळल्यास अष्टलक्ष्मीची कृपा प्राप्त होते. माणसाच्या जीवनातून गरिबी दूर होते आणि त्याच्या पिढ्याही दीर्घकाळ आनंदी जीवन जगतात.
Varlakshmi vratham 2022: श्रावण महिन्यातील शुक्रवार हा विशेष मानला जातो. श्रावणाचा (shravan 2022) तिसरा शुक्रवार माता वरलक्ष्मीला समर्पित आहे. माता वरलक्ष्मीचा उगम क्षीरसागरापासून झाला असे मानले जाते. शास्त्रात माता वरलक्ष्मीचे रूप अतिशय आकर्षक असे वर्णन केले आहे. तिचे स्वरूप स्पष्ट करताना असे म्हटले आहे की माता वरलक्ष्मी स्वच्छ पाण्यासारखी असून सोळा अलंकारांनी व आभूषणाने विभूषित आहे. असे मानले जाते की, माता वरलक्ष्मीचे हे व्रत पाळल्यास अष्टलक्ष्मीची कृपा प्राप्त होते. माणसाच्या जीवनातून गरिबी दूर होते आणि त्याच्या पिढ्याही दीर्घकाळ आनंदी जीवन जगतात. यावेळी वरलक्ष्मी व्रत 12 ऑगस्टला येत आहे. येथे जाणून घ्या या व्रताशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी.
वरलक्ष्मी व्रताला श्रावण पौर्णिमेचा योगायोग
या वेळी वरलक्ष्मी व्रताचे विशेष महत्त्व आहे कारण वरलक्ष्मी व्रतासोबतच श्रावण महिन्याची पौर्णिमाही जुळून येत आहे. यासोबतच या दिवशी सकाळी 11.34 वाजेपर्यंत सौभाग्य योग असून त्यानंतर शोभन योग सुरू होईल. धार्मिकदृष्ट्या हे दोन्ही योग शुभ मानले जातात. पूजेनुसार शुभ मुहूर्त सकाळी 06:14 ते 08:32, दुपारी 01:07 ते 03:26 आणि संध्याकाळी 07:12 ते 08:40 असा असेल.
उपवासाचे महत्त्व
दक्षिण भारतात वरलक्ष्मी व्रताची विशेष ओळख आहे. केवळ विवाहित महिला आणि विवाहित पुरुष हे व्रत ठेवू शकतात. हे व्रत अष्टलक्ष्मीची पूजा करण्याइतके पुण्यकारक मानले जाते. या व्रताचे पालन केल्याने दारिद्र्य दूर होते आणि कुटुंबात सौभाग्य, सुख आणि संतती सर्व काही प्राप्त होते. या व्रताचे पुण्य दीर्घकाळ राहते आणि त्याच्या प्रभावाने पिढ्याही फुलतात.
असे करा व्रत
शुक्रवारी सकाळी स्नान करून व्रताचे आवाहन करावे. लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती पूजेसाठी एका चौरंगावर लाल कपडा घालून ठेवा. यानंतर कुंकुम, चंदन, अत्तर, धूप, वस्त्र, कलश, अक्षत आणि नैवेद्य देवाला अर्पण करा. गणपतीसमोर तुपाचा दिवा आणि देवीला मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. यानंतर गणपतीचे नाव घ्या आणि त्यांच्या मंत्राचा जप करा. त्यानंतर माता वरलक्ष्मीची पूजा सुरू करा. यानंतर स्फटिकाच्या माळाने देवी लक्ष्मीच्या मंत्राचा जप करा. वरलक्ष्मी व्रत कथा वाचा किंवा ऐका. त्यानंतर आरती करावी.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)