Varuthini Ekadashi 2021 : 7 मे रोजी वरुथिनी एकादशी, या दिवशी ‘ही’ कामं चुकूनही करु नये
हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या कृष्णपक्षात पडणारी एकादशी वरुथिनी एकादशी म्हणून (Varuthini Ekadashi 2021) ओळखली जाते. वरुथिनी एकादशी 7 मे 2021 रोजी येत आहे.
मुंबई : हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या कृष्णपक्षात पडणारी एकादशी वरुथिनी एकादशी म्हणून (Varuthini Ekadashi 2021) ओळखली जाते. वरुथिनी एकादशी 7 मे 2021 रोजी येत आहे. एकादशीला भगवान विष्णूची पूजा केली जाते. एकादशीचा दिवस भगवान विष्णूंना अतिप्रिय आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने तुमच्या सर्व समस्या सुटतात. जे लोक या दिवशी उपवास करतात त्यांना वैकुंठाची प्राप्ती होते, अशी मान्यता आहे (Varuthini Ekadashi 2021 Importance Do Not Do These Things On Ekadashi).
एकादशी उपवास ठेवणार्या लोकांना काही नियम पाळावे लागतात. धार्मिक शास्त्रांमध्ये एकादशीच्या दिवशी काही कामे करण्यास मनाई आहे. ही कामे केल्याने शुभ फळ प्राप्त होत नाही.
भात खाऊ नये
मान्यता आहे की एकादशीच्या दिवशी तांदळाचे सेवन करणारे लोक पुढच्या जीवनात कीटकांच्या रुपात जन्माला येतात. म्हणून या दिवशी भात खाऊ नये.
दिवसा झोपू नये
शास्त्रात एकादशीच्या दिवशी दिवसा झोपणे निषिद्ध मानले जाते. या दिवशी आपण सकाळी लवकर उठून पूजा करावी. आपण या दिवशी उपवास करत नसल्यास विष्णू मंत्रांचा जप नक्की करावा.
या गोष्टींचे सेवन करु नका
एकादशीच्या दिवशी काही गोष्टी खाण्यास मनाई आहे. या दिवशी लसूण, कांदा, मांसाहार, मसूरची डाळ इत्यादी गोष्टी खाऊ नयेत.
एकादशीला तुळशीची पाने तोडू नका
एकादशीला तुळशीची पाने तोडू नयेत. पारण करण्यासाठी द्वादशीला मुलाकडून किंवा वयोवृद्धांना पाने तोडण्यास सांगा. तुळशीची पाने स्वतःला तोडू नका. एकादशीच्या दिवशी तुळशीच्या झाडासमोर दिवा लावा आणि श्रृंगारच्या वस्तू अर्पण करा. नंतर ही सामग्री एखाद्या गरीब व्यक्तीला भेट द्या.
वृद्धांचा आदर करा
एकादशीच्या दिवशी घरातील वडीलधाऱ्यांचा आदर करा. त्यांना कोणत्याही प्रकारे दुखवू नका. एकादशीला घरी सुख-समृध्दी कायम ठेवा. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होतात. त्याशिवाय, कुठलेही असे वाईट कृत्य करु नका ज्यामुळे एखाद्याला दु:ख होईल.
ब्रह्मचर्याचे अनुसरण करा
एकादशीला उपवास ठेवणार्या लोकांनी ब्रह्मचर्य पाळले पाहिजे. या दिवशी शारीरिक संबंध ठेवू नये.
आयपीएल स्थगित होताच रियान परागचं ट्विट, नेटकऱ्यांकडून टीकेचा भडीमार, पण ट्विटमध्ये नेमकं काय?https://t.co/ZbsQ81r3pm#IPL #IPL2021 #iplpostponed #iplsuspended @ParagRiyan
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 6, 2021
Varuthini Ekadashi 2021 Importance Do Not Do These Things On Ekadashi
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Kamada Ekadashi 2021 | कामदा एकादशी तिथी, वेळ, महत्त्व आणि कथा, जाणून घ्या…