Vastu Tips : या चार चुका चुकूनही करू नका, नाहीतर तुम्ही कर्जबाजारी झालेच म्हणून समजा
अनेकदा आपण आपल्या नकळत काही चुका करतो, त्यामुळे आपल्याला अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. सोबतच तुमच्यावर आर्थिक संकट देखील कोसळू शकतं.

हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला महत्त्वाचं स्थान आहे. तुम्ही जर वास्तुशास्त्राच्या नियमानुसार तुमच्या घराची रचना केलेली असेल, घरातील वस्तू ठेवलेल्या असतील तर तुमच्या घराला सदैव सुख शांती लाभते असं मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार आपण दिवसभरात जे कार्य करतो त्याचा सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो. त्यामुळे असं मानलं जात की, आपण आपली सर्व कार्य हे वास्तुशास्त्रानुसारच केली पाहिजेत, त्यामुळे आपल्याला मानसिक शांती लाभते, लक्ष्मी मातेची कृपा सदैव आपल्यावर राहाते, कुटुंब आणि घराची भरभराट होते.
मात्र अनेकदा आपण आपल्या नकळत काही चुका करतो, त्यामुळे आपल्याला अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.सोबतच तुमच्यावर आर्थिक संकट देखील कोसळू शकतं. तुमच्या या चुका तुम्हाला कर्जबाजारी बनवू शकतात. त्यामुळे अशा चुका टाळल्या पाहिजेत, असं वास्तुशास्त्रात सांगितलं आहे. आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत.
किचनमध्ये खरकटी भांडी ठेवू नका
जेवण झाल्यानंतर लगेचच भांडी स्वच्छ धुवून टाका, रात्रभर स्वयंपाक घरात खरकटी भांडी ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार असं केल्यास यामुळे तुमच्यावर लक्ष्मी मातेची अवकृपा होऊ शकते, या उलट तुम्ही झोपण्यापूर्वी भांडी धुवून टाकली तर तुमच्यावर सदैव लक्ष्मी माता आणि अन्नपूर्णा मातेची कृपा राहाते.
बेडवर बसून कधीही जेवू नका
वास्तुशास्त्रानुसार बेडवर बसून जेवण करणं अशुभ मानलं जातं. त्यामुळे माता लक्ष्मीची तुमच्यावर अवकृपा होऊ शकते. त्यामुळे बेडवर बसून जेवण करणं टाळावं.
बाथरूमध्ये कधीही खाली बाधली ठेवू नका
वास्तुशास्त्रानुसार चुकनही बाथरूममध्ये खाली बाधली ठेवू नये, बाधली पाण्यानं भरलेली असावी. तसेच सायंकाळच्या वेळी दूध, दही, मीठ या वस्तू कोणालाही देऊ नये. त्यामुळे तुमच्यावर संकटं येऊ शकतात, असं वास्तुशास्त्र सांगते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)