Vastu Tips : घरातील देव्हाऱ्यात ‘या’ 4 मूर्ती असूच नयेत, अन्यथा कुटुंबाचं सुख, चैन संपलच म्हणून समजा

वास्तू शास्त्रानुसार, घरात पूजेचं स्थान नेहमी ईशान्य दिशेला म्हणजेच उत्तर-पूर्व दिशेला असलं पाहिजे. या दिशेत देव्हारा असल्यास किंवा पूजेचं ठिकाण असल्यास घरातील सदस्यांवर सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडतो. तसेच ही ऊर्जा कायम घरातील सदस्यांसोबत राहते.

Vastu Tips : घरातील देव्हाऱ्यात 'या' 4 मूर्ती असूच नयेत, अन्यथा कुटुंबाचं सुख, चैन संपलच म्हणून समजा
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Nov 04, 2024 | 8:46 PM

‘देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी’, हे गाणं आपण सर्वांनी ऐकलं आहे. या गाण्याचे अर्थ खूप सोपे, समजणारे आणि खरेदेखील आहेत. देव अनंतात, चराचरात आहेत. देवावर फक्त श्रद्धा असली पाहिजे. देवाचा वास सर्वत्र आहे, प्रत्येक दिशाला आहे. असं असलं तरी हिंदू घरांमध्ये देवाच्या पूजेला एक वेगळं महत्त्व आहे. शास्त्रांनुसार, घराच्या देवाच्या पूजेसाठी विशेष स्थान आहेत. घरात ज्या ठिकाणी पूजेचं स्थान असतं ती जागा खूप पवित्र मानली जाते. त्यामुळे पूजेच्या ठिकाणची जागा नेहमी स्वच्छ राहावी, असा प्रयत्न सर्वजण करतात. तसेच पूजेच्या ठिकाणी किंवा देव्हाऱ्याच्या ठिकाणी शांतात राहिली पाहिदे. शास्त्रांनुसार, ज्या घरात स्वच्छता आणि शांतमय वातावरण आहे तिथे सकारात्मक शक्तीचा वास असतो.

पूजेच्या ठिकाणी थोडी जरी अव्यवस्था असली तर त्याचा नकारात्मक परिणाम त्या घरात वास्तव्यास असणाऱ्या कुटुंबावर पडतो, असं म्हटलं जातं. त्यामुळे अशुभ वाटतील अशी कोणतीच वस्तू तिथे ठेवू नये. वास्तू शास्त्रानुसार, घरात पूजेचं स्थान नेहमी ईशान्य दिशेला म्हणजेच उत्तर-पूर्व दिशेला असलं पाहिजे. या दिशेत देव्हारा असल्यास किंवा पूजेचं ठिकाण असल्यास घरातील सदस्यांवर सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडतो. तसेच ही ऊर्जा कायम घरातील सदस्यांसोबत राहते. तुम्हाला घरात कोणताही कलह नको असेल, शांतमय, सुखी आणि आरोग्यदायी आयुष्य हवं असेल तर पुढील 7 गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

हे सुद्धा वाचा

‘या’ 7 गोष्टींची नेहमी काळजी घ्या :

  1. वास्तू शास्त्रानुसार, पूजेचं ठिकाण नसेल तर एकाग्रतेने पूजा करता येत नाही. तसेच पूजा केल्याने कोणताही लाभ होत नाही.
  2. देव्हाऱ्यात एकाच देवाचे दोन फोटो ठेवू नये. विशेषत: गणपतीच्या तीन प्रतिमा देव्हाऱ्यात असू नयेत. असं म्हणतात की, तसं असल्यास घरातील शूभ कार्यात अडचणी येतात आणि त्यामुळे कुटुंबात कलह देखील होतो.
  3. घरात ज्या ठिकाणी देव्हारा आहे त्याच्या वरच्या मजल्यावर त्याच ठिकाणी शौचालय असता कामा नये. तसेच पूजेच्या आजूबाजूलादेखील शौचालय असता कामा नये.
  4. वास्तू शास्त्रानुसार, स्वयंपाकघरात देव्हारा असणे योग्य मानलं जात नाही. तसं असल्यास कितीही पूजा-अर्चा केली तरी त्याचं फळ मिळत नाही.
  5. घरातील देव्हाऱ्यात देवाच्या मोठ्या मूर्ती असता कामा नये. घरात शिवलिंग ठेवायचं अशेल तर आपल्या अंगठ्या इतक्याच आकाराचं शिवलिंग घरात असायला हवं. त्यापेक्षा मोठं शिवलिंग असता कामा नये. शिवलिंग खूप संवेदनशील असतं. त्यामुळे घरात नेहमी छोटं शिवलिंग ठेवण्याचा सल्ला नेहमी दिला जातो.
  6. शास्त्रांनुसार, देव्हाऱ्यात कधीही तुटलेल्या मूर्ती ठेवू नयेत. तशा मूर्ती आढळल्यास तातडीने वाहत्या नदीत प्रवाहित केल्या पाहिजेत.
  7. देव्हाऱ्याच्या स्वच्छतेकडे नियमीत काळजी घेतली पाहिजे. देव्हाऱ्यातून कोमजलेल्या फुलांना लगेच काढायला हवे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.