मुंबई : कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात रंगांना विशेष महत्त्व असते. रंग एखाद्याचे आयुष्य रंगीत बनवतात आणि सकारात्मक ऊर्जा भरतात. वास्तुशास्त्रात बऱ्याच गोष्टी नमूद केल्या आहेत, ज्यामध्ये रंग देखील सांगितले गेले आहेत. जरी सर्व रंगांचे स्वतःचे महत्त्व आहे परंतु वास्तुनुसार, हिरवा रंग एखाद्या व्यक्तीच्या जीवनात सौभाग्य, विकास आणि आरोग्याचे प्रतीक आहे. दुसरीकडे, रंग पाहून लोकांना आनंद होतो, इतर रंग पाहून काही वेळा एखादी व्यक्ती तणावग्रस्त होते, तर कोणता रंग पाहताना त्या व्यक्तीचा ताण दूर होतो (Vastu Tips Green Color Benefits According To Vastu Shastra).
फेंगशुईच्या मते, हिरवा रंग अनेक आजारांपासून मुक्त होण्यासाठी देखील उपयुक्त आहे. फेंगशुईच्या मते, हिरवा रंग हा बुद्धिमत्तेचे प्रतीक मानला जातो आणि त्याचा आरोग्यावरही चांगला परिणाम होतो.
आज आम्ही तुम्हाला हिरव्या रंगाच्या काही फायद्यांविषयी सांगणार आहोत.
✳️ हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक आहे आणि व्यक्तीच्या डोळ्यांना याने आराम मिळतो. ज्याप्रकारे निसर्गाने आपल्याला जीवनाचा संदेश दितो, त्याच प्रकारे या रंगाशीही आपल्या जीवनाचा संबंध आहे.
✳️ हिरवा रंग सकारात्मक ऊर्जा आणतो. हा रंग ताण आणि नैराश्य दूर करतो.
✳️ घरात विश्रांतीच्या ठिकाणी, शयन करण्याच्या ठिकाणी आणि सुखद क्षण घालवायच्या ठिकाणी या हिरव्या रंगाचा वापर करा. यामुळे आपले क्षण आनंददायी बनतात.
✳️ हिरव्या रंगामधून घरात एक प्रकारची ऊर्जा वाहते. तसेच, हिरव्या रंगाच्या वातावरणामध्ये काम केल्याने व्यक्तीची सर्जनशीलता वाढते.
✳️ हिरवा रंग आजारी लोकांना लवकरच बरे होण्यास देखील मदत करतो. रक्तदाब सामान्य ठेवण्याबरोबरच मानसिक शांती देखील मिळते, ज्यामुळे मेंदूशी संबंधित अनेक आजारांमध्ये दिलासा मिळतो.
✳️ वास्तुनुसार, घरात हिरव्या रंगाचे घड्याळ लावल्याने आनंदाचा संचार होतो.
Utensil Vastu Tips | स्वयंपाकघरात तुटलेली-फुटलेली भांडी असतील तर आजच बदला, अन्यथा नुकसान होणारhttps://t.co/L58ff0FKRU#Utensils #VastuTips #Vastushastra
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 28, 2021
Vastu Tips Green Color Benefits According To Vastu Shastra
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Best Vastu Tips : आनंदी जीवनासाठी खूपच मौल्यवान असतात हे वास्तू नियम, जाणून घ्या याविषयी सर्वकाही