Vastu | तुम्हीही कॉर्नरच्या घरात राहता? मग हे वास्तूदोष तुम्हाला माहीत असायलाच हवेत!
आज आम्ही तुम्हाला कॉर्नरवाल्या (Corner house) घराशी संबंधीत असणाऱ्या वास्तूदोषांबद्दल सांगणार आहोत. जर तुमचे घर सुध्दा कॉर्नरला तर नाही ना,जर असेल तर हि माहिती तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. घ्या जाणून...

मुंबई: वास्तू दोष फक्त आर्थिकच नाही तर शारीरिक समस्यांचे देखील कारण बनू शकते. जीवनात सगळे काही आलबेल सुरू राहावे यासाठी वास्तू शास्त्रामध्ये सुध्दा काही नियम बनवले गेले आहेत. या नियमांचे योग्य पद्धतीने पालन केले गेले नाही तर अधिक काळापर्यंत तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो, किंवा तुम्हाला आजारपण सुध्दा ग्रासू शकते. बऱ्याचदा आपण ऐकले असेल की, वास्तू दोषमुळे (Vastu dosh) अनेकांना आर्थिक नुकसान, मानसिक त्रास आणि अशांतता या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
आज आम्ही तुम्हाला कॉर्नरला (Corner house) असलेल्या घराच्या वास्तू दोषांबद्दल सांगणार आहोत. या उपायांचा अवलंब करून याच्याशी संबंधित असलेल्या अनेक दोषांपासून आपल्याला स्वतःची सुटका करून घेता येऊ शकते. कदाचित तुमचे घर सुध्दा कॉर्नरचे तर नाही ना, जर हो ,तर हि माहिती तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहे, घ्या जाणून..
कसं जाल?
असे म्हटले जाते की, जर घराचे दोन्ही कोपरे कापणारा रस्ता घराच्या दिशेने येतो त्यावेळेस तुमच्याकडे पैसा तर येतो, मात्र तितक्याच लवकर तो निघूनही जातो. वास्तूनुसार जर रस्ता डाव्या बाजूने घराकडे येत असेल तर महिलांना आणि उजव्या बाजूने येत असेल तर घरातील पुरुषांना त्याचा त्रास होताना दिसतो.
एल आकार काय सांगतो?
जर एखाद्या घराचा आकार एल स्वरूपाचा असेल आणि रस्त्याच्या डाव्या बाजूला असेल तर ते खूप अशुभ मानले जाते. या कारणाने घरात राहणाऱ्या लोकांना शारीरिक नाही तर आर्थिक समस्यांचा सुध्दा सामना करावा लागतो.
अर्धचंद्राकार घेरा काय सांगतो?
घराची स्थिती जर अर्धचंद्राकार घेऱ्यात असेल तर ते सुध्दा अशुभ मानले जाते. अशा घरात राहणाऱ्या सदस्यांना आर्थिक समस्या आणि कौटुंबिक कलहांचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो.
दोन रस्ते आणि व्ही आकार
वास्तू शास्त्रानुसार जर दोन रस्ते व्ही आकारात घराच्या दिशेने येत असतील, तर हे सुध्दा अशुभ मानले जाते. यामुळे घरात राहणाऱ्या पुरुष आणि महिला सदैव अस्वस्थ असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर त्यांच्या करिअरमध्ये देखील मोठे चढउतार पाहायला मिळतात.
Astro Tips : सूर्यास्तानंतर या गोष्टी चुकूनही करु नका, नाहीतर आर्थिक नुकसान नक्कीhttps://t.co/tj7TOf6g7t#AstroTips #Wealth #sun #sunset
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 4, 2022
संबंधित बातम्या:
Vastu Tips | घरात या 4 गोष्टी आहेत ? मग आत्ताच बाहेर काढा नाहीतर…
Astro Tips : सूर्यास्तानंतर या गोष्टी चुकूनही करु नका, नाहीतर आर्थिक नुकसान नक्की