Vastu Tips : या गोष्टी घरात ठेवल्याने येते नकारात्मकता, या वस्तू काढा घराबाहेर
वास्तुशास्त्राच्या नियमानुसार काही वस्तू घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा तयार होते. त्या गोष्टी अधिक दिवस घरात राहिल्याने तुम्ही गरीब होण्याची शक्यता अधिक असते. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या 5 गोष्टी.
मुंबई – वास्तुशास्त्राच्या नियमानुसार तुम्ही जर का ? राहत्या घरी, बेडरूम किंवा घराच्या प्रवेशद्वाराजवळ काटेरी वनस्पती लावली तर तुमच्या वैवाहिक सुखात बाधा येते.तसेच ते झाड आर्थिक समस्या निर्माण करू शकतात. त्यामुळे तुम्ही अशा झाडांना शेतात किंवा घराबाहेर लावू शकता.
जर तुमच्या कोणत्याही कप किंवा प्लेटमध्ये क्रॅक असेल तर त्याचा वापर करू नका. असे करणे अशुभ मानले जाते. तुटलेल्या ताटात अन्न खाल्ल्याने जीवनात संकटे आणि अपयश येऊ शकतात. अशा भांड्यांमध्ये स्वयंपाक केल्याने तुमच्या आरोग्यावर आणि आर्थिक स्थितीवरही परिणाम होतो.
बेडरूमच्या मध्यभागी टिव्ही ठेवू नये. हे देखील परस्पर संघर्षाचे कारण बनू शकते. पण जर तुम्हाला या खोलीत टीव्ही ठेवायचा असेल तर तुम्ही तो दक्षिण-पूर्व कोपर्यात ठेवू शकता.
वास्तुशास्त्रानुसार घरात बंद घड्याळ ठेवणे अशुभ मानले जाते. थांबलेले घड्याळ हे दर्शवते की तुम्ही आयुष्यात अडकले आहात आणि पुढे जात नाही आहात. यामुळे तुमचे नातेसंबंध, करिअर किंवा आर्थिक प्रगती होऊ शकते.
वास्तुशास्त्रानुसार सुकलेली झाडे घरात ठेवू नयेत. ते नकारात्मकता पसरवतात. तुमची सर्व घरातील रोपे चांगल्या स्थितीत असल्याची खात्री करा. हिरवीगार झाडे सकारात्मकतेचा संचार करतात. तुमच्या घरातील रोपांची काळजी घ्या. त्यांना आवश्यकतेनुसार पाणी द्या.