Vastu Tips | स्वयंपाकघरात चुकूनही या वस्तू ठेवू नका, अन्यथा मोठं नुकसान होऊ शकते
आपल्या सर्वांना आपल्या घरात सुख आणि समृद्धी हवी असते (Vastu Tips). कोणतीही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ नये. परंतु बर्याच वेळा प्रयत्न करुनही आपण जसा विचार करतो ते घडत नाही. आपण प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींवरुन बर्याच घरात भांडणं होताना पाहिले असेल. यामागे घरात वास्तुदोषाची समस्या असू शकते.
मुंबई : आपल्या सर्वांना आपल्या घरात सुख आणि समृद्धी हवी असते (Vastu Tips). कोणतीही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ नये. परंतु बर्याच वेळा प्रयत्न करुनही आपण जसा विचार करतो ते घडत नाही. आपण प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींवरुन बर्याच घरात भांडणं होताना पाहिले असेल. यामागे घरात वास्तुदोषाची समस्या असू शकते. वास्तुशास्त्रानुसार, घरातील सुख आणि समृद्धीसाठी स्वयंपाकघर खूप महत्वाचे आहे. वास्तुशास्त्रात स्वयंपाकघराविषयी काही नियम सांगितले गेले आहेत. स्वयंपाक घरात काही गोष्टी ठेवल्याने नुकसान होते. जाणून घेऊया त्याबद्दल (Vastu Tips Never Put These Things In Kitchen Will Increse Your Problems In Life) –
स्वयंपाकघरात औषधी ठेवू नका
बरेच लोक औषध स्वयंपाकघरात ठेवतात. चुकून अशी चूक करु नका. कारण स्वयंपाकघर आपल्या आरोग्याशी संबंधित आहे. म्हणून, कोणतेही औषधं स्वयंपाकघरात ठेवू नये. वास्तुनुसार, असे केल्याने घरात एखादी व्यक्ती आजारी पडू शकते आणि घरात नकारात्मक ऊर्जा वाढते.
स्वयंपाकघरात आरसा लावू नये
वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात आरसा वापरु नये. कारण स्वयंपाकघरात स्टोव्ह असते, ते आगीचा मुख्य केंद्र आहे. याचे प्रतिबिंब असणे आपल्या आरोग्याला हानिकारक ठरु शकते.
स्टोअर रुम म्हणून वापरु नका
बरेच लोक स्वयंपाकघर स्टोअर रुम म्हणून वापरतात. आपण ज्या गोष्टी वापरत नाही त्या स्वयंपाकघरात ठेवू नका. वास्तुनुसार ते योग्य मानले जात नाही. असे मानले जाते की जंक आयटम किचनमध्ये अजिबात ठेवू नये. यामुळे आई अन्नपूर्णाला राग येऊ शकतो.
शिळे अन्न फ्रीजमध्ये ठेवू नका
जास्त शिळे अन्न फ्रीजमध्ये ठेवू नये. यामुळे तुम्हाला शनि-राहू दोष प्राप्त होतो. याशिवाय, शिळे अन्न खाल्ल्याने आरोग्यालाही हानी पोहचू शकते. म्हणून, स्वयंपाकघरात नेहमीच ताजे अन्न शिजवले पाहिजे.
मीठाचा डबा ठेवा
वास्तु शास्त्रानुसार स्वयंपाकघरात मीठाचा डबा ठेवावा. हे मीठ वेळोवेळी बदलत राहा आणि पाण्याने प्रवाहित करा. मीठ नकारात्मक ऊर्जा कमी करते आणि सकारात्मकता वाढवते अशी मान्यता आहे.
Vastu Tips | प्रगतीत अडथळे ठरतात ही झाडं, कधीही घरात, अंगणात लावू नका…https://t.co/NJfaZ0bSp4#VastuTips #Tree #VastuShatra
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 12, 2021
Vastu Tips Never Put These Things In Kitchen Will Increse Your Problems In Life
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Vastu Tips | घरात चुकूनही या ठिकाणी पूर्वजांचे फोटो लावू नका, नुकसान होऊ शकते
Vastu Tips : चिमूटभर मीठ दूर करेल तुमच्या सर्व समस्या, घरात सुख-समृद्धी येईल