Vastu Tips : झाडूमध्ये असतो देवी लक्ष्मीचा वास, या उपायांमुळे कुबरे देवही होईल प्रसन्न

वास्तु आणि धर्मशास्त्रात झाडुचा संबंध थेट देवी लक्ष्मीचा जोडला गेला आहे. जर झाडुसंबंधित नियमांचं व्यवस्थितरित्या पालन केलं नाही तर देवी लक्ष्मी नाराज होते. त्यामुळे नियमांचं पालन करणं गरजेचं आहे.

Vastu Tips : झाडूमध्ये असतो देवी लक्ष्मीचा वास, या उपायांमुळे कुबरे देवही होईल प्रसन्न
Vastu Tips : झाडूसंबंधित या गोष्टी लक्षात ठेवा, देवी लक्ष्मी आणि कुबेराची होईल कृपा
Follow us
| Updated on: Mar 18, 2023 | 5:11 PM

मुंबई : वास्तुशास्त्रात घरातील प्रत्येक वस्तू आणि दिशेचं विशेष असं महत्त्व आहे. वस्तूमध्ये सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेचा वास असतो. त्याचबरोबर वस्तू ठेवण्याचं ठिकाण आणि गुणधर्म हे ही तितकंच महत्त्वाचं असतं. वास्तु आणि धर्मशास्त्रात झाडूला देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं गेलं आहे. झाडूने घरातील अस्वच्छता आणि केर काढण्यास मदत होते. त्याचबरोबर घरातील दारिद्रता घालण्यासाठीही झाडू महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. वास्तुशास्त्र झाडु संदर्भात काही नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचं पालन केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते.

वास्तुशास्त्रात झाडू ठेवण्याची जागा योग्य ठिकाणी असली पाहीजे. कारण एक छोटी चूक तुम्हाला अडचणीची ठरू शकते. त्यामुळे नियमानुसार झाड़ू ठेवल्यास नक्कीच फायदा होतो. त्याचबरोबर झाडू मारण्याचा देखील नियम वास्तुशास्त्रात सांगितला गेला आहे.

झाडूविषयी या चुका करू नका

  • वास्तुशास्त्रानुसार घरातील झाडू कायम लपवून ठेवला पाहीजे. बाहेरच्या व्यक्तीची नजर झाडूवर पडता कामा नये.
  • झाडू कायम जमीनीवर आडवा ठेवावा. उभ्या झाडूमुळे अलक्ष्मीचं आगमन होतं. तसेच आर्थिक स्थिती डळमळून जाते.
  • वास्तुशास्त्रात झाडू मारण्यासाठी रात्रीचा चार प्रहर योग्य नाही. या प्रहरात झाडू मारल्यास घरात दारिद्रतेचा वास होतो. तसेच देवी लक्ष्मी नाराज होते. त्यामुळे त्याचा थेट परिणाम आर्थिक स्थितीवर होतो. झाडू मारण्यासाठी दिवसाचे चार प्रहर उत्तम आहेत.
  • तुटलेली झाडू घरात ठेवू नये. यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. त्यामुळे नवीन झाडू घरात आणावा.
  • वास्तुशास्त्रानुसार झाडू कधीही घराच्या उत्तर पूर्व दिशेला ठेवू नये. झाडू कायम दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवणं शुभ मानलं जातं.
  • झाडू कधीही तिजोरी किंवा देव्हाऱ्याजवळ ठेवू नये. तसेच किचन, डायनिंग टेबल किंना बेडरुमध्ये ठेवू नये. असं केल्यास आर्थिक आणि आरोग्य विषयक अडचणींचा सामना करावा लागतो.
  • कधीही जनावरांना जसं की, गाय, कुत्रा यांना झाडूने मारू नये. असं करणं अशुभ मानलं जातं.
  • जर घरातील एखादा सदस्य कामानिमित्त बाहेर जात असेल तर लगेच झाडू मारू नये. असं केल्यास त्या व्यक्तीला कामात अपयश मिळतं.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'.
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा.
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?.
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा.
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल.
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?.
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी.
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने.
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.