Vastu Tips : ही एक चूक चुकूनही करू नका; माता लक्ष्मी होईल नाराज
प्रत्येकाची हीच इच्छा असते की, लक्ष्मी मातेची आपल्यावर सदैव कृपा राहावी, आपलं घर धन-धान्य आणि पैशांनी भरलेलं राहावं. मात्र त्यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत.

प्रत्येकाची हीच इच्छा असते की, लक्ष्मी मातेची आपल्यावर सदैव कृपा राहावी, आपलं घर धन-धान्य आणि पैशांनी भरलेलं राहावं. मात्र अध्यात्मात सांगितल्यानुसार लक्ष्मी मातेचा स्वाभाव हा चंचल असतो. त्यामुळे लक्ष्मी माता लवकर नाराज होते. वास्तुशास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्या तुम्ही चुकूनही करता कामा नये, त्यामुळे तुमच्यावर लक्ष्मी मातेचा कोप होऊ शकतो. लक्ष्मी माता तुमच्यावर नाराज होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो. आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत.
ज्या घरावर लक्ष्मी मातेची कृपा असते, त्या घरामध्ये सदैव सूख, शांती, ऐर्श्वय, स्थिरता असते. कधीच त्या कुटुंबाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही. मात्र अशा काही गोष्टी असतात ज्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, वास्तुदोषामुळे तुमच्यावर लक्ष्मी मातेची अवकृपा होऊ शकते. तुम्हाला संकटांचा सामना करावा लागू शकतो.
वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात सतत अस्वच्छता असते, त्या घरावर माता लक्ष्मीची अवकृपा होते. तिथे लक्ष्मी माता थांबू शकत नाही. त्यामुळे तुम्ही तुमचं घर सतत स्वच्छ ठेवलं पाहिजे. जे आपलं घरदार स्वच्छ ठेवतात त्या कुटुंबावर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव असतो, तुम्ही तुमचं स्वयंपाक घर आणि देवघर नेहमी स्वच्छ ठेवलं पाहिजे, जर स्वयंपाक घर आणि देवघर स्वच्छ नसेल तर वास्तुदोष निर्माण होतात. ज्यामुळे तुम्हाला अनेक संकटांचा सामना कारवा लागू शकतो.घरातील झाडू इथे-तिथे न फेकता त्याला योग्य दिशेला ठेवा, ज्या घरात झाडू इकडे -तिकडे असा कुठेही फेकलेला असतो, त्या घरात देखील वास्तुदोष निर्माण होतो. वास्तु दोषामुळे तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्या समस्या आर्थिक, तुमच्या आरोग्यविषयक, मान-सन्मानाच्या संदर्भात अशा कोणत्याही प्रकारच्या असू शकतात.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)