Vinayak Chaturthi : या तारखेला आहे विनायक चतुर्थी, या दिवशी चुकूनही करू नका ही कामे अन्यथा नाराज होतील गणपती बाप्पा
मान्यतेनुसार हिंदू धर्मातील कोणतेही शुभ कार्य गणेश पुजनाशिवाय पूर्ण होत नाही. यामुळेच श्रीगणेशाला प्रसन्न ठेवण्यासाठी सनातन धर्मात दर महिन्याला विनायक चतुर्थी (Vinayaki Chaturthi March 2023) व्रत पाळली जाते.
मुंबई : वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षात म्हणजे 23 एप्रिलला रविवारी विनायक चतुर्थी (Vinayak Chaturthi) आहे. विनायक चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा करण्याचे अनेक फायदे आहेत. तसेच या दिवशी उपवास केल्याने गणेश प्रसन्न होऊन भक्तांचे अडथळे दूर करतात आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. परंतु या दिवशी काही विशिष्ट कामे करणे टाळल्यास उचित फलप्राप्ती होते. या दिवसात कोणते काम निषिद्ध आहे ते जाणून घेऊया.
विनायक चतुर्थीला या गोष्टी नक्की पाळाव्यात
- विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपतीजवळ दिवा लावावा व त्यानंतर दिवा लावण्याची जागा वारंवार बदलू नये. तसेच गणेशाला सिंहासनावर ठेवू नये, असे करणे अशुभ मानले जाते.
- विनायक चतुर्थीच्या दिवशी ज्या ठिकाणी गणेशाची स्थापना केली असेल, ती जागा रिकामी ठेवू नये. यासोबतच गणरायाच्या पूजेदरम्यान मन, कर्म आणि शब्द शुद्ध असणे आवश्यक आहे. या दिवशी ब्रह्मचर्यही पाळावे.
- गणेशाच्या पूजेत चुकूनही तुळशीच्या पानांचा वापर करू नका. याचा गणेशजींना राग येतो. पौराणिक कथेनुसार, तुळशीला गणेशाने शाप दिला होता आणि पूजा करण्यास मनाई केली होती.
- विनायक चतुर्थीच्या दिवशी उपवासाच्या काळात फळे खाताना चुकूनही मीठ वापरू नका. यासोबतच या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालणे टाळावे. हे नकारात्मक उर्जेचे प्रतीक मानले जाते.
गणपती पूजनाच्या वेळी या मंत्राचा जप अवश्य करा
- ‘ओम गं गणपतये नमः’ चा जप केल्याने संकटांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात आनंद येतो.
- ‘ओम वक्रतुंडय हूं’ या मंत्राचा जप केल्याने श्रीगणेशाच्या कृपेने कामातील अडथळे दूर होतात.
- ‘ओम श्री गं सौभय गणपतये वर वरद सर्वजनम् मे वशमनाय स्वाहा’ या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारते आणि व्यक्तीच्या नोकरीत येणारे अडथळे दूर होतात.
विनायक चतुर्थीसाठी उपाय
जीवनातील कोणत्याही प्रकारचे संकट दूर करण्यासाठी श्रीगणेशासमोर गोल दिवा लावा. याशिवाय तुमच्या वयाच्या आकड्यानुसार पुजेत लाडूचा नैवेद्य अर्पण करा. पूजा केल्यानंतर एक लाडू स्वतः खा आणि बाकीचे इतरांना वाटून घ्या. याशिवाय भगवान सूर्यनारायणाच्या सूर्यअष्टकाचा 3 वेळा पठण करा.
या दिवसाच्या पूजेमध्ये गणेशाला दुर्वा माळा अर्पण करा. त्यांना तूप आणि गूळ अर्पण करा. पैसे मिळावे म्हणून प्रार्थना करा. पूजेनंतर हे तूप आणि गूळ गायीला खाऊ घाला. हे पाच विनायक चतुर्थीच्या दिवशी करायचे आहे.
आपल्या मुलांना योग्य मार्गावर आणण्यासाठी या दिवसाच्या पूजेत गणपतीला पाच मोदक, पाच लाल गुलाब आणि दूर्वा अर्पण करा. शुद्ध देशी तुपाचा दिवा लावावा. या पूजेनंतर एक मोदक तुमच्या मुलाला प्रसाद म्हणून खायला द्या आणि उरलेले मोदक इतर मुलांना किंवा गरजूंना वाटून द्या.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)