Vinayaka Chaturthi 2021 | विनायक चतुर्थी, या शुभ मुहूर्तात पूजा केल्याने सर्व विघ्न टळतील
आज 13 जुलैला विनायक चतुर्थी आहे (Vinayaka Chaturthi 2021). विनायक चतुर्थी ही दर महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला असते. या दिवशी गणेशाची पूजा केली जाते. हिंदू धर्मात प्रथम गणेशाची पूजा केली जाते. प्रत्येक पूजा सुरु होण्यापूर्वी विघ्नहर्ताची उपासना करण्याची परंपरा आहे.
मुंबई : आज 13 जुलैला विनायक चतुर्थी आहे (Vinayaka Chaturthi 2021). विनायक चतुर्थी ही दर महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला असते. या दिवशी गणेशाची पूजा केली जाते. हिंदू धर्मात प्रथम गणेशाची पूजा केली जाते. प्रत्येक पूजा सुरु होण्यापूर्वी विघ्नहर्ताची उपासना करण्याची परंपरा आहे. मान्यता आहे की, विघ्नहर्ताची उपासना केल्याने सर्व दु: ख दूर होतात. एवढेच नाही तर जिथे गणेशाचे वास्तव्य आहे तेथे सुख आणि समृद्धी येते, असेही मानतात (Vinayaka Chaturthi 2021 Know The Shubh Muhurat For Puja And Importance Of This Day).
भगवान गणेशाच्या भक्तांसाठी विनायक चतुर्थीचा दिवस खूप महत्वाचा आहे. बरेच लोक या दिवशी पूजा करतात आणि उपवास करतात. या दिवशी विधीवत पूजा केल्याने तुमचे सर्व दुःख दूर होतात. विनायक चतुर्थीशी संबंधित महत्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घ्या.
विनायक चतुर्थीचा शुभ मुहूर्त –
✳️ विनायक चतुर्थी प्रारंभ – 13 जुलै 8 वाजून 24 मिनिटांपासून
✳️ सिद्धि योग – 13 जून दुपारी 2 वाजून 49 मिनिटांपर्यंत
✳️ चंद्रोदय – रात्री 9 वाजून 21 मिनिटांनी
मान्यता आहे की सिद्धी योगात पूजा केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच, सर्व रखडलेली कामंही पूर्ण होतात.
विनायक चतुर्थी पूजेची पद्धत
? विनायक चतुर्थीला सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालणे शुभ आहे.
? या दिवशी पूजास्थळ स्वच्छ करुन गंगाजल शिंपडा. आपण मंदिरात पूजा देखील करु शकता.
? गणपतीची मूर्ती स्थापित करा आणि त्यांच्यासमोर दिवा प्रज्वलित करा .
? त्यानंतर गणपतीला लाल कुंकू, अक्षता, फुले इत्यादी अर्पण करा.
? गणेशाला मोदकाचे नैवेद्य दाखवा.
? यानंतर गणेश पाठाचे पठण करा आणि नंतर आरती करावी.
विनायक चतुर्थीचे महत्व काय?
भगवान गणेशाला शक्ती, सामर्थ्य, बुद्धी आणि भरभराटीचे देवता म्हणून त्यांची पूजा केली जाते. मान्यता आहे की, जर कोणी विनायक चतुर्थीच्या दिवशी विधीवत गणरायाची पूजा करते, तर त्या व्यक्तीला सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते. त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तुम्हाला गणेशाच्या आशीर्वादाने आयुष्यात यश मिळेल.
Sankasthi Chaturthi 2021 : आषाढ महिन्याची पहिली संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधीhttps://t.co/xA2u4nX1GA#SankasthiChaturthi #SankasthiChaturthi2021 #LordGanesha
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 27, 2021
Vinayaka Chaturthi 2021 Know The Shubh Muhurat For Puja And Importance Of This Day
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Hanuman Ji | हनुमानजींना संकटमोचन का म्हटलं जातं, जाणून घ्या
Gupt Navratri 2021 | गुप्त नवरात्रीमध्ये देवीची याप्रकारे पूजा करा, व्यापार रातोरात वाढेल