सावधान ! तुमच्या पत्रिकेत चंद्र कमजोर आहे का ? मग होऊ शकतात फुफ्फुसांशी संबंधित आजार, आताच उपाय करा
तुम्हाला माहित आहे का की रोगांचा संबंध आपल्या ग्रह नक्षत्रांशी देखील असतो?
मुंबई : जगातील सर्व लोकांना अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते. कधी कधी याचे कारण आनुवंशिकता असते, तर कधी वाईट जीवनशैली किंवा काही औषधे आणि वैद्यकीय परिस्थिती हे देखील सर्व रोगांचे कारण असू शकते. पण तुम्हाला माहित आहे का की रोगांचा संबंध आपल्या ग्रह नक्षत्रांशी देखील असतो?
ज्योतिषशास्त्रानुसार काही आजार आपल्या ग्रहांच्या वाईट स्थितीमुळे होतात. जेव्हा आपल्या कुंडलीत एखादा ग्रह कमकुवत स्थितीत असतो तेव्हा त्याचे नकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर पडतात. सर्व रोग या नकारात्मक प्रभावांमुळे होतात. फुफ्फुसांशी संबंधित बहुतेक समस्यांचे कारण चंद्राची कमकुवत स्थिती असल्याचे मानले जाते. चला तर मग जाणून घेऊयात चंद्राला प्रबळ बनवण्यासाठी तुम्ही काय करु शकता.
चंद्र कमजोर असताना हे आजार होतात चंद्राचा संबंध पाणी आणि मनवी मनाशी आहे. अशा स्थितीत जेव्हा चंद्र कमजोर असतो तेव्हा व्यक्तीला खोकला, सर्दी, दमा, इत्यादी श्वसन किंवा फुफ्फुसाशी संबंधित आजार होतात. याशिवाय तणाव, नैराश्य, एकाग्रता न लागणे, निद्रानाश इत्यादी मनाला त्रास देणाऱ्या सर्व समस्यांचे कारणही चंद्र मानला जातो. जर तुमच्यासोबतही अशी समस्या असेल तर तुम्ही चंद्राची स्थिती मजबूत करण्यासाठी काही उपाय करा.
चंद्र मजबूत करण्याचे मार्ग 1. चंद्र बलवान होण्यासाठी महादेवाची पूजा करावी आणि किमान 10 किंवा सोमवार उपवास करावा. याशिवाय दर सोमवारी महादेवाचा जलाभिषेक करून शिव चालीसाचा पाठ करावा. यामुळे चंद्र मजबूत होईल आणि मानसिक शांतीही मिळेल.
2. जर तुम्ही सोमवारी उपवास करू शकत नसाल तर सोमवारी मीठाचे सेवन करू नका. दही, दूध, तांदूळ, साखर, तूप यापासून बनवलेले पदार्थ खा, पण त्यातही मीठ वापरू नका.
3. सोमवारी पांढरे कपडे परिधान करा आणि चंद्र मंत्राचा जप नियमितपणे करा. याशिवाय कोणत्याही पात्र व्यक्तीला तूप, दही, पांढरे कपडे, पांढरे मोती किंवा चांदीने भरलेला फुलदाणी दान करा.
4. सकाळी उठून रोज आईच्या चरणांना स्पर्श करा. आईची सेवा करा आणि तिला आनंदी ठेवा. यामुळे चंद्राची स्थितीही मजबूत होते.
5. महादेवाच्या ‘ओम नमः शिवाय’ या मंत्राचा अधिकाधिक जप करा.
टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.
संबंधीत बातम्या :
Zodiac| ‘ठरवलं की करणारच’, चिकाटी हीच ओळख, या 4 राशींची मनं जिंकणं जगातलं सगळ्यात अवघड काम!
Zodiac 2022 | नवीन वर्षात या 5 राशींच्या लोकांचे दोनाचे चार हात होणार, या वर्षी लग्न नक्की!
Zodiac | ‘सुख म्हणजे नक्की हेच असतं’ असं म्हणाल, फक्त दोन दिवस थांबा, या 5 राशींचे नशीब बदलणार