AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Welcome 2023: 2023 मध्ये 13 महिन्याचे हिंदू वर्ष, 19 वर्षानंतर जुळून येतोय असा योग

. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, 2004 साली शेवटचा श्रावण अधिक मास आला होता आणि आता हा योगायोग 19 वर्षांनंतर हा योग येत आहे.

Welcome 2023: 2023 मध्ये 13 महिन्याचे हिंदू वर्ष, 19 वर्षानंतर जुळून येतोय असा योग
अधिक मासImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 03, 2023 | 1:15 PM

मुंबई, नवीन वर्ष 2023 खूप खास असणार आहे, कारण या वर्षी अधिक मास (Adik mas 2023) आहे, जो जवळजवळ दर तीन वर्षांनी येतो. त्यामुळे यंदा हिंदू वर्ष 12 ऐवजी 13 महिन्यांचे असेल. अधिक मास 18 जुलैपासून सुरू होईल आणि 16 ऑगस्ट 2023 पर्यंत राहील. हा महिना श्रावण महिन्याशी जुळणार असल्याने याला श्रावण अधिक असे म्हणतात. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, 2004 साली शेवटचा श्रावण अधिक मास आला होता आणि आता हा योगायोग 19 वर्षांनंतर हा योग येत आहे.

5 महिन्यांचा चातुर्मास

हिंदू धर्मात चातुर्मासाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. चातुर्मासात भगवान विष्णू योग निद्रामध्ये जातात आणि सृष्टीचे व्यवस्थापन भगवान शिवाच्या हातात येते. श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक हे महिने चातुर्मासात येतात. यावेळी चातुर्मास पाच महिन्यांचा असेल. श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक या महिन्यांतही आणखी महिन्यांची भर पडणार आहे. 2023 पूर्वी 1947, 1966, 1985 आणि 2004 मध्ये श्रावण अधिकचे संयोजन करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

हे प्रमुख सण उशिरा येतील

गेल्या वर्षी 11 ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला होता, मात्र 2023 मध्ये हा सण 30 ऑगस्टला येत आहे. म्हणजे यंदा सणाच्या तारखेत 19 दिवसांचा फरक आहे. इतकेच नाही तर यावर्षी जन्माष्टमी, गणेश उत्सव, पितृपक्ष, शारदीय नवरात्री, दसरा, धनत्रयोदशी, दीपावली आणि भाईदूज हे मोठे सणही उशिरा येतील.

अधिकमास म्हणजे काय?

हिंदू दिनदर्शीकेमध्ये दर तीन वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो, ज्याला अधिक मास, मलमास किंवा पुरुषोत्तम म्हणतात. आज आपण अधिक मासचे संपूर्ण गणित समजावून घेऊया. सौर वर्ष 365 दिवस आणि 6 तासांचे असते. तर चंद्र वर्ष 354 दिवसांचे मानले जाते. दोन वर्षात सुमारे 11 दिवसांचा फरक आहे. दरवर्षी येणारे हे 11 दिवस जोडा, मग ते एका महिन्यासारखे असतात. हे अंतर भरून काढण्यासाठी दर तीन वर्षांनी एक चांद्रमास अस्तित्वात येतो, त्याला अधिक मास म्हणतात.

अधिक महिन्यात या चुका टाळा

अधिक महिन्यात काही विशेष गोष्टी करणे टाळा. यामध्ये लग्नासारखी मंगल कार्य करू नयेत. याशिवाय इमारत बांधकाम, मालमत्तेची खरेदी-विक्री, कान टोचणे, मुंडण करणे आणि नवीन कामे सुरू करणे याला मनाई आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)