Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वप्नात गाय दिसण्याचा काय होतो अर्थ? समुद्रशास्त्रात दिली आहे माहिती

आपण अनेकदा पाहिलेली स्वप्ने आपल्या प्रियजनांसोबत किंवा मित्रांसोबत शेअर करतो. पण, त्या स्वप्नाचे अर्थ आपल्याला कळत नाही. स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्ही स्वप्नात गाईला पाहात असाल तर त्याचा अर्थ जाणून घेउया.

स्वप्नात गाय दिसण्याचा काय होतो अर्थ? समुद्रशास्त्रात दिली आहे माहिती
स्वप्नात गाय दिसण्याचा अर्थImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 09, 2023 | 10:14 AM

मुंबई : स्वप्न शास्त्रात (Swapna Shastra) प्रत्येक स्वप्नाचे तपशीलवार वर्णन केले आहे. यानुसार प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो. स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात गाय पाहण्याचा देखील विशेष अर्थ आहे. हिंदू धर्मात गायीला मातेचा दर्जा मिळाला आहे. म्हणूनच स्वप्नात गाय दिसणे देखील खूप शुभ मानले जाते. तथापि, स्वप्नात कोणत्या प्रकारची गाय दिसते यावर देखील बरेच काही अवलंबून असते. स्वप्नात कोणत्या प्रकारची गाय पाहणे म्हणजे काय ते जाणून घेऊया.

स्वप्नात गाय दिसण्याचा अर्थ

जर तुम्हाला स्वप्नात पांढरी गाय दिसली तर याचा अर्थ तुम्हाला भविष्यात अनेक प्रकारचे सुख मिळणार आहे. तुमच्या कुटुंबात काही चांगली बातमी ऐकायला मिळणार आहे. स्वप्नात पांढरी गाय दिसणे खूप शुभ लक्षण मानले जाते. स्वप्नात गायीचे वासरू पाहणे देखील खूप शुभ मानले जाते. हे स्वप्न सांगते की येत्या काही दिवसांत तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होणार आहे. तुम्ही ज्या कामात हात घालाल त्यात तुम्हाला यश मिळेल. हे स्वप्न सांगते की तुमच्या आयुष्यातील त्रास लवकरच संपणार आहेत.

स्वप्नात गायीला भाकरी खाऊ घालणे

स्वप्नात गाईला भाकरी खाऊ घालणे देखील खूप शुभ मानले जाते. असे स्वप्न चांगले आरोग्य दर्शवते. घरातील एखाद्या आजारी व्यक्तीला गाईला भाकरी खाऊ घालण्याचे स्वप्न पडले तर त्याचा अर्थ असा होतो की येत्या काही दिवसांत तो या आजारापासून मुक्त होणार आहे. हे स्वप्न सांगते की तुमचे आरोग्य आधीच सुधारत आहे. दुसरीकडे, स्वप्नात स्वतःला गाईचे दूध पिताना पाहण्याचा अर्थ असा आहे की ज्या कामात तुम्ही बराच काळ गुंतला होता त्यात तुम्हाला यश मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

स्वप्नात गायींचा कळप पाहणे

स्वप्नात गायींचा कळप दिसल्याने लवकर श्रीमंत होण्याची शक्यता असते. हे स्वप्न सांगते की लवकरच तुमची अनेक छोटी कामे पूर्ण होणार आहेत. या सर्व कामांचा तुम्हाला फायदा होणार आहे. स्वप्नात तपकिरी गाय दिसणे म्हणजे समाजात तुमचा आदर वाढणार आहे. तपकिरी गाय संपत्ती आणि समृद्धीचे प्रतिनिधित्व करते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल.
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?.
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?.
वडिलांचं अफेअर अन्.., दिशाच्या मृत्यूचं कारण समोर; क्लोजर रिपोर्ट काय?
वडिलांचं अफेअर अन्.., दिशाच्या मृत्यूचं कारण समोर; क्लोजर रिपोर्ट काय?.
देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?
देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?.
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.