Garuda Purana | मृत्यूनंतर आत्मा कुठे जाते? जाणून घ्या गरुड पुराण काय सांगते

सनातन धर्मात गरुड पुराण हे 18 महापुराणापैकी एक मानले जाते. या पुराणात भगवान विष्णूचे वाहन गरुड आणि श्री हरि यांच्या संभाषणातून लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग, पुण्य, भक्ती, वैराग्य, यज्ञ, तपश्चर्या इत्यादी गोष्टी सांगितल्या आहेत (What Happen To The Soul After Death According To Garuda Purana).

Garuda Purana |  मृत्यूनंतर आत्मा कुठे जाते? जाणून घ्या गरुड पुराण काय सांगते
ब्रह्मचाऱ्याने आई-वडील आणि शिक्षकांशिवाय इतर कोणालाही खांदा देऊ नये. यामुळे त्याचे ब्रह्मचर्य मोडते. अंत्यसंस्कार करण्यापूर्वी, कोणत्याही मृत शरीराला प्रथम गंगाजलाने स्नान करावे आणि चंदन, तूप आणि तिळाच्या तेलाने लेपित करावे.
Follow us
| Updated on: Jun 11, 2021 | 11:22 AM

मुंबई : आपल्यापैकी बर्‍याचजणांनी लहानपणी आपल्या आजी-आजोबांकडून ऐकले (Garuda Purana) असेलच की चांगली कामे केल्याने स्वर्ग मिळतो आणि वाईट कृत्ये आपल्याला नरकात घेऊन जातात. स्वर्गात मानवी आत्म्याचे स्वागत केले जाते आणि त्यांचा सत्कार केला जातो. तर नरकात माणसाला त्याच्या वाईट कर्मांची शिक्षा भोगावी लागते. गरुड पुराणात स्वर्ग आणि नरकाच्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आलाय. सनातन धर्मात गरुड पुराण हे 18 महापुराणापैकी एक मानले जाते. या पुराणात भगवान विष्णूचे वाहन गरुड आणि श्री हरि यांच्या संभाषणातून लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग, पुण्य, भक्ती, वैराग्य, यज्ञ, तपश्चर्या इत्यादी गोष्टी सांगितल्या आहेत (What Happen To The Soul After Death According To Garuda Purana).

तसेच, कर्मांनुसार स्वर्ग आणि नरकात जाण्याचा उल्लेख आहे. गरुड पुराणात, जीवन-मृत्यू आणि मृत्यू नंतरच्या परिस्थिती सांगितल्या गेल्या आहेत. स्वर्ग आणि नरकाचे शब्द किती अचूक आहेत, हे सांगता येत नाही. परंतु गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने एक गोष्ट नक्कीच स्पष्ट केले आहे की आत्मा कधीही संपत नाही.

ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती जुन्या कपड्यांना बदलते आणि नवीन कपडे परिधान करते. त्याचप्रमाणे आत्मा केवळ शरीर बदलते. केवळ पाच घटकांपासून बनविलेले शरीर मरण पावते. अशा परिस्थितीत प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न उद्भवतो, की जर आत्मा मेली नाही तर शरीर मरण पावल्यानंतर ती कुठे जाईल? त्याला नवीन शरीर कसे मिळेल? गरुड पुराणात याबद्दल काय सांगते ते जाणून घ्या –

आत्मा प्रथम यमलोकात जाते

गरुड पुराणानुसार, जेव्हा मृत्यू होतो तेव्हा यमलोकातून दोन यमदूत आत्म्याला सोबत नेण्यासाठी येतात. यमदूत येताच आत्मा शरीर सोडते आणि त्यांच्यासोबत यमलोकाकडे जाते. यमलोकात गेल्यावर यमदूत त्याला 24 तास तिथे ठेवतात आणि आयुष्यात त्याने कोणत्या चांगल्या-वाईट गोष्टी केल्या आहेत हे सांगतात. यानंतर आत्म्याला त्याच घरात सोडले जाते जिथे त्याचं आयुष्य गेले. 13 दिवस आत्मा आपल्या नातेवाईकांसोबत राहतो. मान्यता आहे की ज्याने आयुष्यात चांगली कामे केली त्याला प्राण सोडण्यात फार त्रास होत नाही, परंतु ज्याने वाईट कृत्य केली आहेत, त्याला आपले प्राण सोडताना खूप वेदना होतात.

13 दिवसानंतर पुढचा प्रवास निश्चित होतो

गरुड पुराणानुसार, 13 दिवस पूर्ण केल्यावर आत्म्याला पुन्हा यमलोकाच्या मार्गावर जावे लागते. यमलोकला जात असताना त्याला तीन वेगवेगळे मार्ग भेटतात. स्वर्ग लोक, पितृ लोक आणि नरक लोक. व्यक्तीच्या कर्माच्या आधारे हे निश्चित केले जाते की त्याला कोणत्या मार्गावर पाठविले जाईल.

पहिला अर्चि मार्गचा म्हणजेच देवलोकचा प्रवासाचा मार्ग मानला जातो. दुसरा मार्ग धूम मार्ग पितृलोकचा मार्ग आणि तिसरा मार्ग उत्पत्ती विनाश जो नरकात जाण्यासाठीचा मार्ग आहे. पाप आणि पुण्याला निर्धारित कालावधीपर्यंत भोगल्यानंतर आत्म्याला पुन्हा शरीर प्राप्त होते.

What Happen To The Soul After Death According To Garuda Purana

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Garuda Purana | या तीन सवयी कुटुंबात भांडणे आणि मतभेदांचे कारण ठरु शकतात

Garuda Purana | ‘या’ सवयींमुळे देवी लक्ष्मी होतात नाराज, गरुड पुराणातही आहे याचा उल्लेख

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.