‘धर्मनाथ बिज’ म्हणजे काय आहे, जाणून घ्या तीचे महत्त्व

माघ (Magh) महिन्यातील द्वितीया, तिला धर्मनाथबीज असें म्हणतात या तिथीला नाथपंथात विशेष महत्व आहे. या दिवशीं श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा (Diksha)दिली

'धर्मनाथ बिज' म्हणजे काय आहे, जाणून घ्या तीचे महत्त्व
datta
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 7:34 AM

मुंबई: माघ (Magh) महिन्यातील द्वितीया, तिला धर्मनाथबीज (DharmanathBij) असें म्हणतात या तिथीला नाथपंथात विशेष महत्व आहे. या दिवशीं श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा (Diksha)दिली. व त्या वेळेस सर्व देवी देवतांना आमंञित केले होते. तसेच प्रयाग क्षेञातील सर्व नगरवासी लोकांचाही मोठा मेळा जमला होता. यादिवशी भव्य अन्नदान झाले व श्री गोरक्षनाथांनी आपल्या हातांनी सर्वांना प्रसाद दिला होता. यामुळे सर्वांना अतिशय आनंद झाला. व देवांसह सर्वांनी दरसाल असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी ईच्छा प्रकट केली. श्री गोरक्षनाथांनी “धर्मनाथबीजेचा” उत्सव प्रतिवर्षीं करण्याची त्रिविक्रमास आज्ञा दिली. तेव्हां सर्वास आनंद झाला व दरसाल या दिवशीं उत्सव होऊं लागला. गोरक्षनाथानें आपल्या ‘किमयागिरी’ नामक ग्रंथांत असें लिहिलें आहे कीं. आपापल्या शक्तिनुसार जो कोणी हें बीजेचें व्रत करील त्याच्या घरीं दोष, दारिद्र्य, रोग आदिकरुन विघ्नें स्वप्नांत देखील यावयाची नाहींत. त्या पुरुषांचा संसार सुनियंत्रित चालेल. प्रत्यक्ष लक्ष्मी त्याच्या घरी वास्तव्य करेल अशी मान्यता आहे. प्रयाग क्षेत्री त्रीविक्रम राजाच्या मृत्यू नंतर त्याच्या शरीरात प्रवेश केलेले व 12 वर्ष राज्य सांभाळलेले गुरु मच्छीद्र नाथ यांचा बीज अंश असलेला पुत्र धर्मराज यास वयाच्या 12 व्या वर्षी गुरु गोरक्षनाथ यांनी नाथ दिक्षा दिली तों हा दिवस दरवर्षी धर्मनाथ बीज म्हणून साजरा केला जातो , या दिवशी सर्व नाथ, भक्तगणं, साधू ऋषी मुनी ज्यांना कोणाला नाथ सांप्रदाय अभ्यासायचा आहे ज्यांना दिक्षा दिली जाते.

धर्मनाथ बीज उत्सव कसा साजरा करावा १२ वर्षांनी “माघ शुद्ध द्वितीया” ह्या दिवशी गोरक्षनाथ ह्यांनी धर्मनाथास नाथपंथाची दीक्षा दिली. तो सोहळा इतका अमुल्य झाला होता कि गोरक्षनाथ ह्यांनी सर्व प्रजेसमोर घोषणा केली की, जो कुणी यथाशक्ती ह्या द्वितीयेच्या दिनी दान धर्म, पुण्य कर्म करील, त्याचे सर्वतोपरी नाथ कल्याण करतील. त्याचे घरी सुख, शांती, धन संपदा नांदू लागेल व त्याचे मार्ग सुकर होतील. हा सोहळा “धर्मनाथ बीज” ह्या उत्सवाने ओळखला जातो. या दिवशी आपल्या घरी अथवा नाथांचे मंदिर असेल तर त्याठिकाणी श्री नवनाथांचे प्रतिमेचे पुजन करावे. हार-पुष्प अर्पण करावे. धुप-दिप दाखवावा. व श्री नवनाथ भक्तीसार ग्रंथातील ३४ वा अध्याय पठण करावा. त्यानंतर नैवेद्य दाखवुन नाथांची आरती करावी व यथाशक्ती अन्नदान करावे. ज्यांना शक्य असेल त्यांनी ज्वारीच्या पिठाचे आंबील, घेवड्याची भाजी, हरबऱ्याच्या घुगऱ्या , मलिदा, वडे, ई. नैवेद्यही अर्पण करु शकता.

धर्मनाथ बीजेचे महत्व माघ महिन्यातील द्वितीया, तिला धर्मनाथबीज असें म्हणतात या तिथीला नाथपंथात विशेष महत्व आहे. या दिवशीं श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली. व त्या वेळेस सर्व देवी देवतांना आमंञित केले होते. तसेच प्रयाग क्षेञातील सर्व नगरवासी लोकांचाही मोठा मेळा जमला होता. यादिवशी भव्य अन्नदान झाले व श्री गोरक्षनाथांनी आपल्या हातांनी सर्वांना प्रसाद दिला होता.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या :

Chanakya Niti | रिस्क हैं तो इश्क हैं ! व्यवसाय सुरू करताय? मग आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 5 गोष्टी पाहाच

Vastu Tips | घरात या ठिकाणी बसून जेवण केल्यास फटका बसणार, दारिद्र्याच्या दिशेनं वाटचाल ठरलेली!

Chanakya Niti : जन्मापूर्वीच तुमच्या नशिबात ‘या’ गोष्टी लिहिलेल्या असतात, जाणून घ्या याबद्दल!

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.