राम आणि कृष्ण तुळशी मध्ये काय आहे फरक? कोणती तुळस लावल्याने घरात येते सुख समृद्धी

राम तुळशीचा वापर बहुतेक धार्मिक विधींमध्ये केला जातो, यासोबतच अनेक प्रकारच्या आजारांवर औषध म्हणून वापरला जातो. तज्ज्ञांच्या मते, राम तुळशीची चव इतर तुळशीपेक्षा जास्त गोड असते. यासोबतच राम तुळशीची पाने हिरवी असतात.

राम आणि कृष्ण तुळशी मध्ये काय आहे फरक? कोणती तुळस लावल्याने घरात येते सुख समृद्धी
तुळस
Follow us
| Updated on: Apr 16, 2023 | 9:39 AM

मुंबई : हिंदू धर्मात तुळशीच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. पूजेच्या दृष्टीकोनातून याला जिथे धार्मिक महत्त्व आहे, तिथे आयुर्वेदात अनेक आजारांवर रामबाण उपाय मानले गेले आहे. आयुर्वेद आणि घरगुती औषधात तुळशीला खूप महत्त्व आहे. तुळशीचे इतके आरोग्यदायी फायदे आहेत की अनेक जण तिला जादुई औषधी वनस्पती म्हणतात. तुळशीचे अनेक प्रकार (Types of Tulsi) आहेत, पण राम तुळशी आणि कृष्ण तुळशीचा जास्त वापर केला जातो. राम तुलसी आणि कृष्ण तुलसीबद्दल लोकांच्या मनात अनेकदा शंका असते. तुळशीच्या दोन्ही प्रकारांबद्दल तुम्हाला माहिती आहे का? जर तुम्हाला फरक माहित नसेल तर  जाणून घ्या कोणती तुळस तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

अनेक प्रकारच्या रोगांवर वापरली जाते तुळस

राम तुळशीचा वापर बहुतेक धार्मिक विधींमध्ये केला जातो, यासोबतच अनेक प्रकारच्या आजारांवर औषध म्हणून वापरला जातो. तज्ज्ञांच्या मते, राम तुळशीची चव इतर तुळशीपेक्षा जास्त गोड असते. यासोबतच राम तुळशीची पाने हिरवी असतात.

दुसरीकडे कृष्ण तुळशीला श्यामा तुळशी म्हणूनही ओळखले जाते. त्याच्या पानांचा रंग गडद हिरवा आणि जांभळा असतो. त्याची देठही जांभळ्या रंगाची असते. धार्मिक कार्यात कृष्ण तुळशीचा वापर फारच कमी किंवा जवळजवळ नसतो. कृष्ण तुळशीची चवही थोडी कडू असते. दोन्ही तुळशींना आपापल्या ठिकाणी विशेष महत्त्व आहे. घरात राम तुळशी लावल्याने सुखसमृद्धी मिळते, तर कृष्ण तुळशी किंवा श्यामा तुळशीचा वापर आयुर्वेदातही केला जातो.

हे सुद्धा वाचा

राम तुळशी किंवा कृष्ण तुळशी कोणती आरोग्यासाठी आहे फायदेशीर?

तज्ज्ञांच्या मते, राम आणि कृष्ण या दोन्ही प्रकारची तुळशी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दोन्ही तुळशीचा उपयोग ताप, त्वचेच्या समस्या, पचनाच्या समस्या इत्यादींवर केला जातो. राम तुळशीला नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढवणारी वनस्पती मानली जाते, यासोबतच अनेक वेळा लोक उच्च रक्तदाब आणि तणावाचा धोका कमी करण्यासाठी देखील याचा वापर करतात. राम तुळशीला कॅन्सरविरोधी गुणधर्मांसाठीही ओळखले जाते.

दुसरीकडे, जर आपण कृष्ण तुळशीबद्दल बोललो, तर ते मुख्यतः लहान मुलांमध्ये खोकला आणि सर्दीची समस्या टाळण्यासाठी ओळखले जाते. श्‍वसनाचे आजार असलेले लोकही कृष्ण तुळशीचा वापर करतात. त्यातील अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म हृदयरोग कमी करण्यास मदत करतात. कृष्ण तुळशी मधुमेहाच्या समस्येवरही फायदेशीर आहे.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी

तुळशीबाबत आतापर्यंत केलेल्या अभ्यासात हेही समोर आले आहे की, याच्या पाण्याचे सेवन केल्याने लठ्ठपणा आणि वजन कमी होण्यास मदत होते. यासोबतच तोंडाची दुर्गंधी असलेल्या रुग्णांसाठीही हे खूप प्रभावी आहे. कृष्ण तुळशीमुळे मुलांची लांबी रुंदी वाढण्यासही मदत होते.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते तुळशीचे सेवन करण्याचाही एक मार्ग आहे. रोज सकाळी रिकाम्या पोटी दोन ते चार पानांचे सेवन करावे. याशिवाय त्याची पाने चहामध्ये मिसळूनही सेवन करता येते.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.