Eid Ul Fitr 2022: जाणून घ्या, ईद उल फितर आणि ईद उल अजहा मध्ये नेमका फरक काय ?
रमजान महिना मु्स्लिम बांधवांमध्ये अत्यंत पवित्र महिना मानला जातो. यामध्ये चंद्रदर्शनाचे महत्व असते. रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी चंद्रदर्शन झाल्यावर ईद संपूर्ण जगभर साजरी केली जाते.
3 मे देशभरात रमजान ईद (Ramdan Eid) म्हणजे ईद उल फितर साजरी केली जातेय. रमजान महिना मु्स्लिम बांधवांमध्ये अत्यंत पवित्र महिना मानला जातो. यामध्ये चंद्रदर्शनाचे महत्व असते. रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी चंद्रदर्शन झाल्यावर ईद संपूर्ण जगभर साजरी केली जाते. त्यालाच ईद- उल – फित्र (Eid ul Fitra 2022) म्हणजेच रमजान ईद असं म्हणतात.
संपूर्ण देशात ईद उल फित्र हा उत्सव मोठ्या उत्साहात होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील नागरिकांना सोशल मीडियावरून ईदच्या शुभेच्छा दिल्या. ईद उल फितरच्या जवळ जवळ दिड महिन्यानंतर म्हणजे 70 दिवसानंतर मुस्लिम समुदायात आणखी एक उत्सव येतो. त्याल ईद उल अजहा (Eid ul Adha) म्हणतात. ज्याला सर्वसामान्य लोक बकरी ईद असं समजतात. ह्या दोन्ही ईद मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहात साजरी (Eid celebrations) करतात.
हे दोन्ही सण वेगवेगळे असून सार्वजनिक स्वरूपात ते एकसारखेच असतात. यात अल्हाचे आभार मानले जातात. यादोन्ही ईदच्या वेळी अल्हाचे आभार मानले जातात. आजच्या दिवशी एकमेकांना गळाभेट देऊन ईदी देतात अशाप्रकारे एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात.
ईद – उल- फितर (Eid ul Fitra)
रमजान मध्ये मुस्लीम बांधव 30 दिवस उपवास करतात. त्याला रोजे म्हणतात. मुस्लिम कथांनुसारस जंग – ए – बद्र नंतर ईद साजरी करण्याची प्रथा सुरू झाली. या युद्धात मुस्लिमांचा विजय झाला होता आणि याचे नेतृत्व पोषित मोहम्मद पैगंबर करत होते. त्यामुळे ईद साजरी करून विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. इस्लामिक कॅलेंडरमधील नववा महिना हा रमजानचा महिना समजला जातो. याच महिन्यात हजरत मोहम्मद पैगंबरांना त्यांच्या साधनेचे फळ मिळाले. इस्लामिक धारणेप्रमाणे, अल्हाने त्यांच्यामार्फत कुराण हा धर्मग्रंथ लोकंपर्यंत पोहचवला.
ईद उल अजहा (Eid ul Adha)
रमजानचा पवित्र महिना संपल्यानंतर मुस्लिम बांधव सुमारे 70 दिवसांनी ईद उल अजहा साजरी करतात. यालाच बकरीईद असं ही म्हणतात. बरेच मुस्लिम बांधव यादिवशी बकऱ्याचा बळी देतात. हजरत इब्राहिमने याच दिवशी खुदाच्या सांगण्यावरून आपला मुलगा हजरत इस्माइल याला कुर्बान द्यायला जात होता. तेव्हा आपल्या मुलाला कुर्बान करताना वाईट वाटू नये म्हणून त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली होती. डोळ्यावरील पट्टी काढल्यानंतर त्यांना मुलगा परत हसत – खेळताना दिसला आणि एका प्राण्याचा बळी गेला होता. अल्हाने चमत्कार केला आणि आपल्या मुलाचे प्राण वाचले. तेव्हा पासून हा सण कुर्बानीसाठी खास मानला जातो.