Hartalika Vrat : कधी आहे हरतालिका तीज व्रत? जाणून घ्या पूजेचे विधी आणि महत्त्व

पतीच्या दीर्घायुष्यासाठी केले जाणारे हरतालिका तीज व्रत कधी आहे आणि या पूजेचे विधी काय आहेत, तसेच त्याचे धार्मिक महत्व काय आहे, हे जाणून घेण्यासाठी हा लेख जरूर वाचा.

Hartalika Vrat : कधी आहे हरतालिका तीज व्रत? जाणून घ्या पूजेचे विधी आणि महत्त्व
Hartalika VratImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 26, 2022 | 10:30 AM

पुराण काळापासून भाद्रपद महिन्यातील (Bhadrapad Month) शुक्ल पक्षातील तृतीयेच्या दिवशी केले जाणारे हरतालिकेच्या व्रताचे (hartalika teej vrat) मोठे महत्व असते. हे व्रत कुमारिका, चांगला, सुयोग्य वर मिळावा म्हणून करतात तर विवाहीत स्त्रिया हे व्रत सुखी वैवाहिक जीवन आणि आपल्या पतीच्या (happy, peaceful married life) दीर्घायुष्यासाठी करतात. या वर्षी हरतालिकेचे व्रत आणि पूजा 30 ऑगस्ट,2022 मंगळवारी करण्यात येणार आहे. हे व्रत करताना महिला शंकर आणि पार्वतीच्या मातीच्या मूर्तीची विधिवत पूजा करतात आणि उपास (pooja and fast) धरतात. हरतालिका व्रताच्या पूजेचे विधी, शुभ मुहूर्त आणि या व्रताचे धार्मिक महत्व याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

हरतालिका तीज व्रतासाठी शुभ मुहूर्त

पंचागातील माहितीनुसार, या वर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्लपक्षातील तृतीयेची पवित्र तिथी 29 ऑगस्ट 2022, सोमवारी दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी सुरू होत असून 30 ऑगस्ट 2022, मंगळवारी दुपारी 3 वाजून 33 मिनिटांपर्यंत आहे. हरतालिका तीजचे व्रत ३० ऑगस्ट २०२२ रोजी उदय तिथीमध्ये ठेवण्यात येणार असून या दिवशी पहाटे ५ वाजून ५८ मिनिटे ते ८ वाजून ३१ मिनिटांपर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त असेल.

हरतालिका तीज व्रताच्या पूजेचे विधी

भगवान शिव (शंकर) आणि माता पार्वती यांच्या कृपेचा वर्षाव करणाऱ्या हरतालिका तीज व्रताची पूजा प्रदोष कालात अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जाते. अशा वेळी या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर एका पाटावर स्वच्छ, लाल रंगाचे कापड पसरवून त्यावर पार्वती आणि शंकराची मातीची मूर्ती केळ्याच्या पानावर ठेवावी. त्यानंतर एका कलशावर नारळ ठेवून सर्वप्रथम त्याची पूजा करावी. नंतर शंकर-पार्वतीच्या मूर्तीला कुंकू लावून अक्षता, फुलं वाहून पूजा करावी. त्यानंतर फळंआणि गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवून विधिवत पूजा करावी. पूजेदरम्यान पार्वतीच्या मूर्तीवर श्रृंगाराचे सर साहित्य ठेवावे आणि हरतालिकेच्या व्रताच्या कथेचे वाचन करावे व ऐकावे. पूजा झाल्यानंतर शंकर-पार्वतीची आरती करावी.

हरतालिका व्रताचे नियम

हरतालिकेच्या व्रताचा नियम म्हणजे एकदा हे व्रत सुरू केले की ते सोडता येत नाही आणि जोपर्यंत शक्य आहे, तोपर्यंत दरवर्षी ते यथाशक्ती करावे लागते. हरतालिकेचे व्रत करताना पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करतात, ती पूर्ण व्हावी यासाठी 11 नवविवाहीत स्त्रियांना 16 शृंगाराशी निगडीत वस्त, सामग्री भेट म्हणून द्यावी. सुखी वैवाहिक आयुष्याची मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी हरतालिकेच्या व्रताच्या दिवशी पार्वतीला खिरीचा नैवेद्य अवश्य दाखवावा.

( टीप- येथे देण्यात आलेली उपलब्ध स्त्रोतांवरून देण्यात आलेली आहे. यातील तथ्यांबद्दल आम्ही कोणताही दावा करत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.