नवीन वर्षात कधी आहे संकष्टी चतुर्थी? जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व
हिंदू धर्मामध्ये कोणतीही पूजा करताना सर्वप्रथम गणपतीची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी संकष्टी चतुर्थीचा उपवास करतात. संकष्टी चतुर्थीचा उपवास हा गणपतीला समर्पित आहे. नवीन वर्षात संकष्टी चतुर्थी कधी आहे आणि त्याचे महत्त्व काय आहे ते जाणून घेऊ.
दर महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचा उपवास केला जातो. पंचांगानुसार माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी केली जाणार आहे. या दिवशी गणपतीची विधीनुसार पूजा आणि उपवास केला जातो. बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशात या संकष्टी चतुर्थीला तीळवा आणि तीळकुटा असे हे म्हणतात. स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी आयुष्यासाठी हा उपवास करतात. स्त्रिया या दिवशी निर्जळी उपवास ठेवून आणि रात्री चंद्राला अर्घ्य देऊन उपवास सोडतात.
कधी आहे संकष्टी चतुर्थी?
पंचांगानुसार माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 17 जानेवारी रोजी पहाटे 04:06मिनिटांनी सुरू होत आहे. तसेच 18 जानेवारी रोजी सकाळी 5.30 वाजता समाप्त होईल. यामुळे उदय तिथीनुसार शुक्रवारी 17 जानेवारी रोजी संकष्टी चतुर्थीचा उपवास केला जाईल.
संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्राची पूजा केल्यानंतरच हा उपवास पूर्ण मानला जातो. या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री 9.09 मिनिटांनी आहे.
पूजा विधी
संकष्टी चतुर्थीचा उपवास करण्यासाठी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करावे. यानंतर संकष्टी चतुर्थी उपवासाचा संकल्प करावा. नंतर लाकडी पाटावर लाल कपडा टाकून गणपतीची मूर्ती ठेवून त्याची प्रतिष्ठापना करा. त्यानंतर त्याला कुंकू लावून तुपाचा दिवा लावा. नंतर गणपतीच्या मूर्तीला फुले, फळे आणि मिठाई चा नैवेद्य दाखवा. या पूजेमध्ये तीळकुटाचा नैवेद्य आवश्यक समाविष्ट करा. या दिवशी गणेश चालीसाचे आवर्जून पठण करा. पूजेच्या शेवटी गणपतीची आरती आणि शंखनाद करून पूजा पूर्ण केल्यानंतर प्रसाद खाऊन या व्रताचे पारणे करा.
संकष्टी चतुर्थीचे महत्त्व
संकष्टी चतुर्थी चा उपवास विघ्नहर्ता गणपतीला समर्पित आहे. या दिवशी स्त्रिया उपवास करतात आणि आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि यशस्वी भविष्यासाठी प्रार्थना करतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी स्त्रिया निर्जळी उपवास करतात. रात्री चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच हा उपवास सोडतात. त्यामुळे संकष्ट चतुर्दशीला चंद्राचे दर्शन आणि पूजा करण्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. या दिवशी गणपतीच्या पूजेमध्ये तिळाचे लाडू किंवा मिठाई अवश्य ठेवा आणि चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच उपवास सोडा.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)