आज मासिक शिवरात्री; जाणून घ्या तिथी, शुभमूहूर्त आणि पूजा विधी
हा विशेष दिवस प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षादरम्यान चतुर्दशी तिथी किंवा श्रावण महिन्याच्या पंधरवड्याच्या चौदाव्या दिवशी येतो. हिंदू श्रद्धेनुसार, श्रावण महिन्यात महाशिवरात्रीला अभिषेक करण्याला विशेष महत्त्व आहे.
मुंबई : सध्या पवित्र श्रावण महिना चालू आहे. हा महिना भगवान शंकराच्या उपासनेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शिव शंकरांची पूजा करणाऱ्यांना ध्यान करण्याचा हा महिना आहे. भगवान शंकर हे सर्व प्राण्यांचे रक्षणकर्ते आहेत. त्यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. श्रावण शिवरात्री 2021 हा श्रावण महिन्यातील सर्वात शुभ दिवसांपैकी एक दिवस आहे. या दिवशी भक्त एक दिवसाचा उपवास करतात आणि समृद्ध आणि शांत जीवनासाठी भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा करतात. (When is the monthly Shivratri, Know the dates, auspicious moments and pooja rituals)
हा विशेष दिवस प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षादरम्यान चतुर्दशी तिथी किंवा श्रावण महिन्याच्या पंधरवड्याच्या चौदाव्या दिवशी येतो. हिंदू श्रद्धेनुसार, श्रावण महिन्यात महाशिवरात्रीला अभिषेक करण्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात श्रावण शिवरात्री किंवा मासिक शिवरात्री हिंदू चंद्र दिनदर्शिकेनुसार आज म्हणजे शुक्रवार, 6 ऑगस्ट, 2021 रोजी आहे.
श्रावण शिवरात्री 2021 तारीख आणि वेळ
तारीख : शुक्रवार, 6 ऑगस्ट, 2021
निशिता काळ पूजा वेळ – 7 ऑगस्टच्या मध्यरात्री 12:06 ते 12:48
रात्री प्रथम प्रहर पूजेची वेळ – सायंकाळी 07:08 ते रात्री 09:48
रात्री द्वितीय प्रहर पूजा वेळ – 7 ऑगस्टला रात्री 09:48 ते मध्यरात्री 12:27
रात्री तृतीय प्रहर पूजा वेळ – 7 ऑगस्टला मध्यरात्री 12:27 ते पहाटे 03:06
रात्री चतुर्थी प्रहर पूजा वेळ – 7 ऑगस्टला पहाटे 03:06 ते पहाटे 05:46
चतुर्दशीचा तिथी प्रारंभ – 6 ऑगस्टला सायंकाळी 06:28 वाजता
चतुर्दशीची तिथी समाप्त – 7 ऑगस्टला सायंकाळी 07:11
शिवरात्री पारण वेळ – 07 ऑगस्टला पहाटे 05:46 ते दुपारी 03:47
श्रावण शिवरात्री 2021 चे महत्व
हिंदू श्रद्धेनुसार या दिवशी भगवान शिवशंकर आणि पार्वतीची पूजा करणाऱ्या भक्तांना आनंदी, शांती आणि समृद्ध जीवनाचा आशीर्वाद मिळतो. यासह एखाद्याला भूतकाळ आणि वर्तमानाच्या पापांपासून मुक्ततादेखील मिळते. या दिवशी उपवास केल्याने व्यक्तीच्या आत्म्याला मोक्ष प्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे.
महामृत्युंजय मंत्र
ॐ हौं जूं सः ॐ भूर्भुवः स्वः ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान्मृ त्योर्मुक्षीय मामृतात्
श्रावण शिवरात्री 2021ची पूजा पद्धत
– श्रावण शिवरात्री पूजा मध्यरात्री केली जाते. ही पूजा निशिता काल नावाने ओळखली जाते. म्हणून पूजा सुरू करण्यापूर्वी स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला.
– शिव मंदिरात जाऊन गंगा जल तसेच दूध, तूप, मध, दही, सिंदूर, साखर, गुलाब पाणी इत्यादी पवित्र जल अर्पण करून शिवलिंगावर अभिषेक करा. अभिषेक करताना ‘ओम नम: शिवाय’ चा जप करत रहा.
– चंदनाने टिळा लावा आणि धतुरा, बेलाची पाने आणि अगरबत्ती लावा.
– महामृत्युंजय मंत्र, शिव चालीसा आणि ‘ओम नम: शिवाय’चा 108 वेळा जप करा.
– शेवटी भगवान शिव आणि देवी गौरीची आरती करून पूजा समाप्त करा. (When is the monthly Shivratri, Know the dates, auspicious moments and pooja rituals)
लोकल सुरु करा, अन्यथा 15 हजार रुपये भत्ता द्या, ईएमआय बंद करा; रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी https://t.co/1OEwbVB3qD @OfficeofUT @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @mipravindarekar #MumbaiLocal #UddhavThackeray #MahavikasAghadi #LocalTravel
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 5, 2021
इतर बातम्या