Vastu | नवीन दागिने आणि कपडे कधी खरेदी करावे, जाणून घ्या योग्य दिवस

प्रत्येकाला नवीन कपडे आणि दागिने घालायला आवडतात. नवीन कपडे घातल्याने मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे आत्मविश्वास वाढतो. पण, तुम्हाला माहीत आहे का की नवीन कपडे आणि दागिने तुमच्यासाठी अशुभ ठरु शकतात. होय, काहीवेळा या नवीन गोष्टी तुमच्यासाठी अशुभ ठरतात आणि हे आपल्याला माहीतही नसते.

Vastu | नवीन दागिने आणि कपडे कधी खरेदी करावे, जाणून घ्या योग्य दिवस
when to buy jwellery
Follow us
| Updated on: Oct 24, 2021 | 2:44 PM

मुंबई : प्रत्येकाला नवीन कपडे आणि दागिने घालायला आवडतात. नवीन कपडे घातल्याने मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे आत्मविश्वास वाढतो. पण, तुम्हाला माहीत आहे का की नवीन कपडे आणि दागिने तुमच्यासाठी अशुभ ठरु शकतात. होय, काहीवेळा या नवीन गोष्टी तुमच्यासाठी अशुभ ठरतात आणि हे आपल्याला माहीतही नसते.

ज्योतिषशास्त्रानुसार, जर तुम्हाला कधी खरेदीसाठी जायचे असेल तर शुक्रवार हा दिवस यासाठी सर्वोत्तम आहे. कारण शुक्र हा धन, ऐश्वर्य आणि सुख, वस्त्र यांचा कारक ग्रह मानला जातो. या दिवशी कपडे इत्यादी खरेदी करणे देखील शुभ मानले जाते.

नवीन कपडे कधी खरेदी करायचे

शुक्रवारी कपडे खरेदी करणाऱ्यांना कपड्यांचे नुकसान होत नाही. परंतु जर तुम्ही शनिवार आणि रविवारी नवीन कपडे खरेदी केले तर हे करु नका. तुम्ही या दिवशी नवीन कपडे खरेदी करु नये. असे नवीन कपडे घालण्यासाठी मंगळवार आणि शनिवार हे दिवस अशुभ मानले जातात. याशिवाय बुधवार, गुरुवार आणि रविवार किंवा सोमवारी तुम्ही नवीन कपडे घालू शकता, जे खूप शुभ आहे.

दागिने कधी खरेदी करायचे

जर तुम्ही दागिन्यांच्या खरेदीसाठी जाण्याचा विचार करत असाल किंवा नवीन दागिने घालण्याचा विशेष प्रसंग शोधत असाल तर यासाठी देखील एक शुभ दिवस आहे. कपड्यांसारखे दागिने घालण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी शनिवार अशुभ आहे. रविवार, सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार हे सर्वात शुभ दिवस आहेत.

कोणत्या रंगाचे कपडे कधी घालायचे

जर तुम्ही कधी दुःखी असाल तर गुलाबी किंवा लाल रंगाचे कपडे घाला. तसेच, यशासाठी पिवळा रंग घाला. जर तुम्ही कापड विकत घेतले असेल आणि त्यावर शाई, काजळी, चिखल, शेण इत्यादी लागलेले असेल तर ते खरेदी करु नका, ते अशुभ आहे.

असे दागिने घालू नका

त्याचबरोबर नवीन दागिने घालताना ते तुटणे अशुभ मानले जाते. फाटलेले आणि जळलेले कपडे घालू नका कारण हे राहूचे निवासस्थान आहे असे मानले जाते. याशिवाय, न धुता नवीन कपडे परिधान केल्याने बुध ग्रहाचा तुमच्यावर अशुभ प्रभाव पडू शकतो. पुष्य नक्षत्रात नवीन कपडे घातल्याने तुम्हाला धन प्राप्त होईल. उत्तरा फाल्गुनीमुळे उत्पन्न वाढेल, तसेच जुन्या आजारातून मुक्तता होईल.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Vastu tips | मनी प्लांट लावताय? या गोष्टींची काळजी घ्या, पैशांची कमतरता कधीच भासणार नाही!

Temple vastu at flat | घरात देवघर नेमके कुठं असावं?, वाचा देव्हाऱ्याचे नियम

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.