Makar Sankranti: मकर संक्रांतीला कधी करावे स्नान अन् दान? जाणून घ्या शुभ मुहूर्त

हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला मोठे महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. या दिवशी स्नान आणि दान करण्याला विशेष महत्त्व प्राप्त झाल आहे. जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दान करण्यासाठी कोणता शुभ मुहूर्त आहे आणि या दिवशी स्नान आणि दानाचे काय महत्त्व आहे?

Makar Sankranti: मकर संक्रांतीला कधी करावे स्नान अन् दान? जाणून घ्या शुभ मुहूर्त
मकर संक्रांतीला कधी करावे स्नान अन् दान? Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 16, 2024 | 2:40 PM

हिंदू धर्मातील एक विशेष सण म्हणजे मकर संक्रांत. मकर संक्रांत हा वर्षातील पहिला सण आहे. मकर संक्रांत कधी 15 जानेवारी तर कधी 14 जानेवारीला साजरी केली जाते. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते. पंचांगानुसार 2025 मध्ये मकर संक्रांत कधी आहे आणि या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त कोणता ते जाणून घेऊ.

कधी आहे मकर संक्रांत?

पंचांगानुसार 2025 मध्ये मकर संक्रांत 14 जानेवारीला मंगळवारी आहे. सकाळी 09 : 03 मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 09 : 03 पासून सुरु होईल आणि संध्याकाळी 05: 46 मिनिटांनी संपेल. या मुहूर्तावर स्नान करून दान केल्यास पुण्य प्राप्त होते हा पूर्ण कालावधी 8 तास 42 मिनिटांचा आहे.

स्नान आणि दानाचा मुहूर्त

मकर संक्रांतीच्या दिवशी पुण्या काळ सकाळी 09.03 पासून सुरू होईल आणि 10.48 नंतर संपेल. हा महापुण्य काळ एक तास 45 मिनिटांचा आहे. ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार या काळात स्नान आणि दान करणे अत्यंत शुभ मानल्या जाते. पुण्य काळ आणि महापुण्यकाळात मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करून दान केल्यास विशेष फळ प्राप्ती होते.

हे सुद्धा वाचा

मकर संक्रांतीचे महत्त्व

हिंदू धर्मानुसार या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. त्यामुळे दिवस मोठे होतात आणि थंडी हळूहळू कमी होते. मकर संक्रांत हा सण नवीन पिकाच्या आगमनाचे प्रतीक आहे. मकर संक्रांति पासून सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणाकडे जाऊ लागतो. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा, यमुना आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याची पूजा करण्याची परंपरा आहे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.