भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर कधी भरला होता पहिला कुंभमेळा, जाणून घ्या पहिल्या कुंभमेळ्या बाबत सविस्तर

प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून महा कुंभ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये देशातूनच नव्हे तर परदेशातूनही भाविक श्रद्धेने स्नान करण्यासाठी येतात. प्रयागराज मध्ये महा कुंभमेळा होत असल्याची चर्चा अधून मधून होत असते. पण स्वातंत्र्य भारताचा पहिला कुंभ मेळा कधी आणि कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता हे तुम्हाला माहिती आहे का ? जाणून घेऊया स्वातंत्र भारताच्या पहिल्या कुंभमेळ्या बाबत.

भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर कधी भरला होता पहिला कुंभमेळा, जाणून घ्या पहिल्या कुंभमेळ्या बाबत सविस्तर
Follow us
| Updated on: Jan 06, 2025 | 1:56 PM

प्रयागराज मध्ये 13 जानेवारीपासून महा कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हे 45 दिवस चालणार आहे या महा कुंभमेळ्याची सांगता 26 फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या शाही स्नानाने होणार आहे. यावर्षी होणाऱ्या महा कुंभमेळ्याबद्दल खूप चर्चा आहे. परंतु स्वातंत्र्य भारतात पहिला कुंभमेळा कुठे आणि कोणत्या वर्षी आयोजित केला होता हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊया स्वातंत्र्य भारताच्या पहिल्या कुंभमेळ्याबद्दल.

प्रयागराज येथे भरली होती जत्रा

स्वातंत्र्यापूर्वीही कुंभ, अर्ध कुंभ आणि माघ मेळाव्याचे आयोजन केल्या जात होते. हे ब्रिटिश सरकारच्या वतीने आयोजित केले जायचे. त्या काळात इंग्लंडहुन अधिकारी यायचे जे या मेळाव्याचे व्यवस्थापन करायचे. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर प्रयागराज मध्ये 1954 ला पहिल्या कुंभ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

पंतप्रधान नेहरूंनी केले होते स्नान

या कुंभमेळ्याच्या आयोजनाची तयारी काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली होती. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनीही या कुंभमेळ्यात सहभाग घेतला होता. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी मौनी अमावस्येच्या दिवशी संगमाच्या तीरावर स्नान केले होते. यादरम्यान एका हत्तीचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला होता. या अपघातात 500 जणांना आपला जीव गमवावा लागल्याचे सांगण्यात येते. तेव्हापासून कुंभमेळाव्यात हत्तीच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली होती.

VIP प्रवेशावर निर्बंध

हत्तीचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्यानंतर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी मुख्य स्नानावेळी VIP ना बंदी घालण्याचे आदेश दिले होते. आजही अर्धकुंभ, कुंभ आणि माघ कुंभ या मुख्य स्नानाच्या उत्सवांमध्ये व्हीआयपी यांच्या प्रवेशावर बंदी कायम आहे. स्वातंत्र्यानंतर प्रयागराज मध्ये झालेल्या या कुंभात बारा कोटी लोकांनी सहभाग घेतला होता.

अशी होती कुंभमेळ्याची व्यवस्था

यूपी चे तत्कालीन मुख्यमंत्री गोविंद बल्लभ पंत यांनी या कुंभाच्या तयारीचा बोटीतून आणि पायी जाऊन आढावा घेतला. या काळात भाविकांच्या उपचारासाठी संगमाच्या काठावर तात्पुरते रुग्णालय बांधण्यात आल्याचे देखील सांगितले जाते. हरवलेल्या लोकांची ओळख पटवण्यासाठी आणि गर्दीला माहिती देण्यासाठी लाऊड स्पीकर देखील होते. याशिवाय कुंभमेळ्यात रोषणाईसाठी 1000 पथदिवे ही लावण्यात आले होते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.