कुंभमेळ्यानंतर कुठे गायब होतात नागा साधू? कसे आहे रहस्यमयी जीवन
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महा कुंभाचे आयोजन केले जाणार आहे. सोमवारपासून महा कुंभमेळा सुरू होणार आहे. नागा साधू हेच सनातन धर्माच्या अनोख्या आणि अतिशय तपस्वी परंपरेचा एक भाग आहेत. जे महा कुंभ मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होतात. नागा साधूच्या रहस्यमयी जीवनामुळे ते केवळ कुंभामध्ये सामाजिक दृष्ट्या दिसतात. ते कुठून येतात आणि कुंभमेळ्यानंतर कुठे जातात हे कोणालाच माहिती नाही.
बारा वर्षातून एकदा महा कुंभमेळ्याचे आयोजन केल्या जाते. यंदाचा कुंभमेळा 13 जानेवारीपासून सुरू होत आहे. या काळात नागा साधू आकर्षणाचा केंद्र असता. येथे मोठ्या संख्येने नागा साधू दिसतात मात्र यानंतर हे साधू कुठे दिसत नाही मग ते कुठे गायब होतात? लाखो नागा साधू कोणत्याही वाहनाचा वापर न करता आणि लोकांच्या नजरेत न येता कुंभामध्ये पोहोचतात. असे मानले जाते की ते हिमालयात राहतात आणि कुंभमेळ्याच्या वेळीच सामान्य लोकांमध्ये दिसतात.
कुंभमेळ्यातील दोन सर्वात मोठे नागा साधूंचे आखाडे आहे. वाराणसीतील महापरिनिर्वाण आखाडा आणि पंच दशनाम जुना आखाडा. बहुतेक नागा साधू येथूनच येतात. नागा साधू अनेकदा त्रिशूल घेऊन येतात आणि त्यांचे शरीर राखेने झाकतात. हे साधू रुद्राक्षाची माळ आणि प्राण्यांच्या कातडीचे कपडे घालतात. कुंभमेळात अंघोळ करण्याचा अधिकार त्यांना प्रथम आहे त्यानंतरच बाकीच्या भाविकांना आंघोळ करण्याची परवानगी दिली जाते. पण कुंभमेळा संपल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या गुढ दुनियेत परत जातो.
नागा साधूंचे जीवन
कुंभमेळ्यात नागा साधू त्यांच्या आखाड्यांचे प्रतिनिधीत्व करतात. कुंभानंतर ते आपापल्या आखाड्यात परत जातात. आखाडे भारताच्या विविध भागात आहेत आणि हे साधू तेथे ध्यान, साधना, आणि धार्मिक शिकवणी देतात. नागा साधू त्यांच्या तपस्वी जीवनशैलीसाठी ओळखले जातात. कुंभमेळ्या नंतर अनेक नागा साधू हिमालय, जंगले आणि इतर शांत आणि निर्जन ठिकाणी ध्यान आणि तपश्चर्येसाठी जातात. ते कठोर तपश्चर्या आणि ध्यानात वेळ घालवतात. जे त्यांच्या आत्म्याच्या आणि आध्यात्मिक अभ्यासाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. कुंभमेळा किंवा इतर धार्मिक कार्यक्रमाच्या वेळीच ते सार्वजनिक ठिकाणी दिसतात.
तीर्थक्षेत्री वास्तव्य करतात
काही नागा साधू काशी, हरिद्वार, ऋषिकेश, उज्जैन किंवा प्रयागराज यासारख्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांमध्ये राहतात. ही ठिकाणे त्यांच्यासाठी धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांची केंद्रे आहेत. नागा साधू बनण्याची किंवा नवीन नागा साधूंना दीक्षा देण्याची प्रक्रिया केवळ प्रयागराज, नाशिक, हरिद्वार आणि उज्जैनच्या कुंभमेळामध्येच होते. परंतु त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे नागा म्हटले जाते. उदाहरणार्थ प्रयागराज मध्ये दीक्षा घेणाऱ्या नागा साधूला राज राजेश्वर म्हणतात. उज्जैन मध्ये दीक्षा घेणाऱ्याला खुनी नागा साधू आणि हरिद्वार मध्ये दीक्षा घेणाऱ्याला बर्फानी नाका साधू असे म्हणतात. यासोबतच नाशिकमध्ये दीक्षा घेणाऱ्याला बर्फानी आणि खिचडीया नागा साधू म्हणतात.
तीर्थयात्रा करतात
नागा साधू भारतभर धार्मिक दौरे करतात. विविध मंदिरे धार्मिक स्थळांना भेट देऊन धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन ते आपली उपस्थिती दर्शवतात. अनेक नागा साधू गुप्त राहतात आणि सामान्य समाजापासून दूर राहतात. त्यांची आध्यात्मिक साधना आणि जीवनशैली त्यांना समाजापासून वेगळं आणि स्वतंत्र बनवते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)