Vastu Tips: दारी तुळस न्यारी, जपा एकत्र कुटुंबाची जबाबदारी, वास्तूशास्र सांगतं, ते करा एकदा तरी!

तुळस अनेक आजारांवर औषधी आहे.आयुर्वेदातही तुळशीच्या रोपाला महत्त्व आहे.वास्तुशास्त्रात अनेक झाडे आहेत, जी घरातील दोष दूर करण्यास मदत करतात. घरात तुळशीचे रोप लावल्याने सकारात्मक उर्जा मिळते, असंही सांगण्यात येतं.

Vastu Tips: दारी तुळस न्यारी, जपा एकत्र कुटुंबाची जबाबदारी, वास्तूशास्र सांगतं, ते करा एकदा तरी!
Follow us
| Updated on: May 12, 2022 | 4:07 PM

कौटूंबिक संबंध चांगले होण्यासाठी बहुगूणी तुळस (Tulsi)जाणून घ्या तुळशीचे महत्व. हिंदू धर्मात (Hindu Dharma)तुळशीच्या रोपाला अत्यंत पवित्र मानलं जातं. तुळस अनेक आजारांवर औषधी आहे.आयुर्वेदातही तुळशीच्या रोपाला महत्त्व आहे.वास्तुशास्त्रात अनेक झाडे आहेत, जी घरातील दोष दूर करण्यास मदत करतात. घरात तुळशीचे रोप लावल्याने सकारात्मक उर्जा मिळते, (Positive Energy) असंही सांगण्यात येतं. यारोपाची पूजा केली जाते. वास्तूशास्रानुसार (Vastushastra) या रोपाला कोणत्या दिशात ठेवावे. याचे फायदे जाणून घ्या.

हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते. तुळशीच्या रोपाला पवित्र मानलं जातं. विष्णु देवाला हे रोप प्रिय आहे असं मानलं जातं. हे रोप शक्यतो प्रत्येक घरात असतंच. तुळशीच्या रोपाचे अनेक फायदे असतात. लोक शक्यतो याचा वापर सामान्य, सर्दी, फ्लू आणि खोकला कमी करण्यासाठी वापरतात. तुळशीच्या रोपाचे अनेक फायदे आहेत. तुळशीचं रोप घरात ठेवल्याने घरात सुख शांती नांदते. घरातील आर्थिक स्थिती सुधारते. तुळशीच्या रोपाचे फायदे काय आहेत. ते कोणत्या दिशेला ठेवावे जाणून घ्या.

शुद्ध वातावरण

तुळशीचे रोप घरात ठेवल्याने हवा शुद्ध होते. तुळशीचे रोप हवेतील दूषित रसायनं शोषित करतात. तुळशीच्या रोपाने वातावरणात सकारात्मकता निर्माण होते.

नकारात्मक ऊर्जा कमी करतं

या रोपाचे केवळ वैद्यकीय लाभच नाहीत तर ते तणाव देखील दूर करतं. घरात तुळशीचे रोप लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. त्याने सकारात्मक ऊर्जा राहते. घरात दुर्भाग्य येण्यापासून रोखतं.

समृद्धीसाठी

तुळशीचे रोप घरात सौभाग्य आणतं. हे धनसंपत्तीसंबंधीत समस्या दूर करतात. तुळशीचे रोप घरात लावल्याने आर्थिक स्थितीत सुधार येतो. हे रोप खूप लाभकारी मानले जाते.

वाईट नजरे पासून रक्षण करते

असं मानलं जातं की हे रोप घरात लावल्याने तुम्ही वाईट नजरांपासून स्वत: च रक्षण करू शकता.

कुटूंबिक संबंध मजबूत बनवतं

घरात तुळशीचे रोप लावणं घरासाठी फायदेशीर मानलं जातं. हे कुटूंबातील सदस्यांमधील नात्याला मजबूत बनवतं. त्याने घरातील लोक एकमेकांसोबत चांगला वेळ घालवतात.

तुळशीचे रोप घरात कुठे ठेवाल?

यारोपाची सर्वात चांगली दिशा पूर्व आहे. हे तुम्ही उत्तर किंवा उत्तर पूर्व बालकनीवर खिडकीत ठेवले जाऊ शकते. हे अशा ठिकाणी ठेवा जिथे योग्य प्रमाणात ऊन मिळेल. तुळशीच्या रोपाजवळ झाडू, चप्पला, कचरा वैगरे ठेवू नका. त्याने नकारात्मकता येते. या रोपा जवळचे वातावरण साफ असले पाहिजे. सुखलेलं रोप घराच्या बाहेर ठेवा. ते नकारात्मक ऊर्जा आणतं. हे रोप स्वच्छ ठिकाणी ठेवा. दररोज तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावा.

( दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.