देवाला अर्पण केलेले फूल किंवा हार पडणे शुभ की अशुभ, काय सांगते ज्योतिष शास्त्र

आपण देवाला हार किंवा फुलं अर्पण केले आणि तो अचानक खाली पडला. त्यावेळेला आपल्या मनात अनेक शंका येतात. काहीजण याला शुभ संकेत असं म्हणतात तर काहीजण काहीतरी चुकीचे घडणार असल्याचा संकेत मानतात.

देवाला अर्पण केलेले फूल किंवा हार पडणे शुभ की अशुभ, काय सांगते ज्योतिष शास्त्र
देवाला अर्पण केलेले फूल किंवा हार पडणे शुभ की अशुभ, काय सांगते ज्योतिष शास्त्र
Follow us
| Updated on: Nov 10, 2024 | 8:54 PM

आजही अनेक घरांमध्ये सकाळी देवाची पूजा न चुकता केली जाते. देवाची पूजा करताना लागणाऱ्या साहित्यांपैकी महत्त्वाचे साहित्य म्हणजे फुल. फुलाशिवाय कुठलीही पूजा अपूर्ण मानली जाते. जेव्हाही आपण मंदिरात जातो किंवा घरी पूजा करत असतो तेव्हा आपण देवाला फुले किंवा हार अर्पण करतो. पण जर ते फुल किंवा हार पडले तर त्याचे काय संकेत आहेत हे आपल्याला माहिती नसतात.

जेव्हा आपण एखादा मंदिरात जातो तेव्हा आपण आदर आणि भक्तीचे प्रतीक म्हणून त्या देवाला फुले आणि हार अर्पण करतो. परंतु अनेक वेळा असे घडते की आपण देवाला हार किंवा फुलं अर्पण केले आणि तो अचानक खाली पडला. त्यावेळेला आपल्या मनात अनेक शंका येतात. काहीजण याला शुभ संकेत असं म्हणतात तर काहीजण काहीतरी चुकीचे घडणार असल्याचा संकेत मानतात.पण याचा खरा अर्थ काय आहे ते जाणून घेण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही. जाणून घेऊया याचा खरा अर्थ काय आहे आणि ते आपल्यासाठी काय सूचित करते?

संधी किंवा संकटाचा संकेत

मंदिरात गेल्यावर देवाला अर्पण केलेली फुलाचा हार किंवा फुल खाली पडल्यास ते येऊ घातलेल्या संकटाचे लक्षणे असू शकते असे काही जण म्हणतात.तर ही एक चेतावणी असू शकते जी तुमच्या जीवनातील बदल आणि निर्णयाच्या गरजेवर जोर देते. जेणेकरून तुम्ही तुमच्या निर्णयावर पुन्हा विचार करू शकाल आणि भविष्यात येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार रहाल.

हे सुद्धा वाचा

वेळ आणि जागेचा प्रभाव

फुलाचा हार किंवा फुल देवाला अर्पण केल्या नंतर ते पडले तर ते आपल्या जागेचा किंवा वेळेचा परिणाम असू शकतो. उदाहरणार्थ तुम्ही चुकीच्या वेळी पूजा केली किंवा तुम्ही चुकीच्या ठिकाणी बसून फुल किंवा हार अर्पण केला असा त्याचा अर्थ असू शकतो.

देवाचा संदेश

देवाला अर्पण केलेला फुलाचा हार किंवा फुल अचानकपणे खाली पडले तर तो देव तिथे हजर असून तुमची भक्ती पहात असल्याचा संकेतही असू शकतो. यामुळे ही दैवी घटनाही शुभ मानले जाऊ शकते. या परिस्थितीत तुम्ही तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणले पाहिजेत जे आध्यात्मिक वाढीसाठी आवश्यक असू शकतात.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.